
जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये (Pahalgam Terrorist Attack) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भीषण आणि भ्याड हल्ला केला. लष्कर-ए-तैयबाच्या हिट स्क्वॉड द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवर अंदाधूंद गोळीबार करणारे दहशतवादी टीआरएफ या संघटनेच असल्याचे खुद्द टीआरएफकडून स्पष्ट करण्यात आले. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “हल्लेखोरांना सोडनार नाही.” असे वक्तव्य केले आहे. दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेणारी टीआरएफ (TRF) ही संघटना काय आहे आणि कोण चालवते ? या संघटनेचा मनसुबा काय ? सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया. (Pahalgam Terrorist Attack)
लष्कर- ए- तैय्यबाने केली पर्यटन स्थळांची रेकी
नंदनवन काश्मीर पुन्हा एकदा पाकिस्तानी अतिरेक्यांच्या हिंसक अत्याचाराला बळी पडले आहे. या हल्ल्यामागील आतापर्यंतची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे. पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर- ए- तैय्यबाने एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात काश्मीरच्या अनेक पर्यटन स्थळांची रेकी केल्याचे उघडकीस आले आहे. यात पहलगाम येथील हॉटेल होते. यातून आणखी एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेचा म्होरक्याचं नाव घेतले जात आले आहे. (Pahalgam Terrorist Attack)
सैफुल्लाह कसुरी कोण आहे ?
पर्यटकातील पुरुषांना त्याचे नाव आणि धर्म विचारात अतिरेक्यांनी एकेक करुन टीपल्याने या हल्ल्या मागे कोणती संघटना असावी यावर तर्क वितर्क सुरु असतानाच इसिसचेही नाव पुढे आले असताना आता लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असलेल्या रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या हल्ल्याचा मास्टरमाईंड लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख सैफुल्लाह कसुरी असल्याचे म्हटलं जात आहे. लष्कर – ए- तैयबाचा म्होरक्या हाफिज सईद याचा सैफुल्लाह कसुरी हा उजवा हात असल्याचे म्हटले जात आहे. (Pahalgam Terrorist Attack)
कधी झाली स्थापना?
TRF या संघटनेचे सदस्य लक्ष्य ठरवतात आणि ते साध्य करण्याचा प्रयत्न करतात. या संघटनेचे दहशतवादी गैर-काश्मिरी लोकांना मारतात. त्यामुळे बाहेरील लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होऊन ते जम्मू-काश्मीरमध्ये येत नाहीत. जम्मू काश्मीरात सरकारने पर्यटन धोरण आणले आहे. त्याला छेद देण्याचा प्रयत्न टीआरएफचा आहे. द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) 2019 या वर्षी अस्तित्वात आली. असे म्हटले जाते की, टीआरएफला पाकिस्तानकडून आणि आयएसआयकडून निधी दिला जातो. (Pahalgam Terrorist Attack)
TRF कडे काय आहे जबाबदारी ?
द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) या दहशतवादी संघटनाकडे काश्मीरच्या उत्तर, मध्य आणि दक्षिणेसाठी प्रत्येकी एक हँडलर आहे. सज्जाद गुल, सलीम रहमानी आणि साजिद जाट हे तिघे टीआरएफचे नैतृत्व करतात. दक्षिण काश्मीर युनिटचे नियंत्रण सज्जाद जट यांच्याकडे आहे, तर हंझाला अंदनान उत्तर काश्मीर युनिट हाताळते. मध्य काश्मीरसाठी, हँडलर खालिद आहे आणि तिघेही लष्कर-ए-तय्यबाचे प्रमुख आहेत. प्रत्येक हँडलर प्रत्येक क्षेत्रासाठी जबाबदार असतो आणि यामुळे त्यांना गटावर अधिक नियंत्रण मिळवणे सोपे जाते. अतिरेकी गट हिजबुल मुजाहिद्दीनने सोडलेली जागा भरून काढण्याचाही टीआरएफ प्रयत्न करत आहे. रियाझ नायकूच्या हत्येनंतर हिजबुलने आता सैफुल्ला मीर उर्फ गाझी हैदरची नेतृत्व करण्यासाठी निवड केली आहे. हिजबुल मुजाहिदीनची जागा आणि कमी TRF ला भरायची आहे. मोठ्या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारून आणि तीव्र दहशतवादी कारवाया करुन ते काश्मीरमधील स्थानिक क्षेत्रात शिरकाव करण्याचे लक्ष्य ठेवत आहे. (Pahalgam Terrorist Attack)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community