Pahalgam Terrorist Attack नंतर 24 तासांत तिसरी चकमक ; उधमपूरमध्ये एक जवान हुतात्मा, सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना वेढले

Pahalgam Terrorist Attack नंतर 24 तासांत तिसरी चकमक ; उधमपूरमध्ये एक जवान हुतात्मा, सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना वेढले

143

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या (Pahalgam Terrorist Attack) बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना मारलं. या घटनेनं देश हादरला असून, ‘दोषींना सोडणार नाही’ असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांनी दिला आहे. (Pahalgam Terrorist Attack)

दरम्यान, आता गेल्या २४ तासांत जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेली ही सलग तिसरी चकमक सुरू आहे. उधमपूरच्या दुडू बसंतगडमध्ये सुरक्षा दलांनी काही दहशतवाद्यांना घेरले आहे. तर, यावेळी एक जवान हुतात्मा झाला आहे. (Pahalgam Terrorist Attack)

यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. २३ एप्रिल रोजी संध्याकाळी सुरक्षा दलांनी तंगमार्ग परिसरात दहशतवाद्यांना घेरले. येथे दहशतवादी एका घरात लपले होते. त्याच वेळी, २३ एप्रिल रोजी सकाळी बारामुल्लाच्या उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. सैन्याने २ दहशतवाद्यांना ठार मारले होते. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा दलांना २-३ दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करताना दिसले. (Pahalgam Terrorist Attack)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.