पेहलगाम हल्ल्यानंतर सीमा सुरक्षा दला (BSF)ने पंजाब पोलिसांच्या मदतीने अमृतसर जिल्ह्यात दहशतवादी कट उधळून लावला. जिल्ह्यातील भरोपाल गावाजवळ सुरक्षा दलाच्या शोध मोहिमेत शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त केला. पहलगाम हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय सीमेवर वाढलेल्या तणावानंतर बीएसएफ (BSF)ने केलेल्या या कारवाईत २ हातबॉम्ब, ३ पिस्तूल, ६ मॅगझिन व ५० जिवंत काडतुसे जप्त केली. ही स्फोटके पुढील तपासाकरता स्थानिक पोलिसांकडे देण्यात आली आहेत.
दरम्यान, शस्त्रास्त्रांची तस्करी व भारतीय हद्दीत घुसखोरी याबाबत सुरक्षा दले (BSF) सतर्क असून सीमेपलीकडील हालचालीवर भारतीय सैन्याचे बारीक लक्षदेखील आहे. २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममधील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी २७ पर्यटकांची हत्या केली होती. त्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोरात कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.
भारत-पाकिस्तान सीमेवर शस्त्रास्त्रांची तस्करी, ग्रेनेड टाकणे आणि ड्रोनद्वारे दहशतवादी संघटनांचे आक्रमण यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता भारताच्या सुरक्षा संस्था कोणत्याही संशयास्पद हालचाली शोधण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर देण्याकरिता पंजाब पोलिसांनी तगडी सुरक्षाव्यवस्था केली असून सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टम तैनात करण्यात येणार आहे. अॅटी-ड्रोन सिस्टममुळे सीमेवरील बारीक हालचालींवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. (BSF)
Join Our WhatsApp Community