Jammu and Kashmirमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; ५ जवान हुतात्मा, ६ जखमी

जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील माचेडी भागात दहशतवाद्यांनी हिंदुस्थानी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला.

129
Jammu and Kashmirमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; ५ जवान हुतात्मा, ६ जखमी

जम्मू-कश्मीरमधील (Jammu and Kashmir) कठुआ जिल्ह्यातील माचेडी भागात सोमवारी, (८ जुलै) लष्कराच्या ताफ्यावर प्राणघातक दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात ५ जवान हुतात्मा झाले, तर ६ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. लष्कराच्या कॉर्प्सच्या हद्दीत ही घटना घडली.

जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील माचेडी भागात दहशतवाद्यांनी हिंदुस्थानी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला. दहशतवादी हल्ल्यानंतर जवानांनी हल्लेखोरांना जोरदार प्रत्युत्तर देत गोळीबार केला, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली. जम्मू-कश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांत दहशतवादी हल्ल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

(हेही वाचा – Modi Meets Putin: ”तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणं हा योगायोग नाही, तुम्ही…”; व्लादिमीर पुतिन यांनी केलं पंतप्रधान मोदींचं कौतुक!)

राजौरी जिल्ह्यातील माजाकोट भागात ७ जुलै रोजी लष्कराचा एक जवान जखमी झाल्यानंतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी एक मोठी शोध मोहीम सुरू करण्यात आली होती.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.