पाकिस्तानकडून सीमापार दहशतवादी(Terrorism) हल्ले सुरूच राहिले तर त्याचे परिणाम भोगावेच लागतील, असा सज्जड दम परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नेदरलँड्समधील स्थानिक दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. परराष्ट्रमंत्र्यांनी नेदरलँड्सच्या अधिकृत दौऱ्यादरम्यान म्हटले की, आम्हाला दहशतवादा(Terrorism)चा निश्चित अंत हवा असून हाच आमचा संदेश आहे. सद्यस्थितीस युध्दविरामामुळे एकमेकांविरुध्द लष्करी कारवाया थांबल्या आहेत, असेही एस. जयशंकर यावेळी म्हणाले.
(हेही वाचा पंतप्रधान Narendra Modi यांचा पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा; म्हणाले, “”माझ्या नसांमध्ये रक्त…” )
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करताना एस. जयशंकर म्हणाले, पाकिस्तानी लष्करी नेतृत्वाचे धार्मिक विचार अतिरेकी आहेत. त्यामुळे जर पाकिस्तानकडून दहशतवादी(Terrorism) हल्ले सुरूच राहिले तर त्याचे परिणाम भोगावे लागतील हे पाकिस्तानी लोकांनी चांगलेच समजून घेतले पाहिजे, असे परराष्ट्रमंत्री म्हणाले.
महत्त्वाचे म्हणजे भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला नियोजित राजकीय दौरा रद्द केला होता. त्यानंतर आता परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुरूवार, २२ मे रोजी नेदरलँड्सचा दौरा केला. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या दौऱ्यात आर्थिक सहकार्य आणि दहशतवादविरोधी तसेच या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या पुनर्नियोजित भेटीसाठी तयारीच्या चर्चांवर भर देण्यात आला.(Terrorism)
Join Our WhatsApp Community