Sunita Jamgade : पाकिस्तानातून परतलेली महाराष्ट्राची सुनीता जामगडे बीएसएफच्या रडारवर ; प्रकरण काय ?

Sunita Jamgade : पाकिस्तानातून परतलेली महाराष्ट्राची सुनीता जामगडे बीएसएफच्या रडारवर ; प्रकरण काय ?

129
Sunita Jamgade : पाकिस्तानातून परतलेली महाराष्ट्राची सुनीता जामगडे बीएसएफच्या रडारवर ; प्रकरण काय ?
Sunita Jamgade : पाकिस्तानातून परतलेली महाराष्ट्राची सुनीता जामगडे बीएसएफच्या रडारवर ; प्रकरण काय ?

भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषा (एलओसी) बेकायदेशीरपणे ओलांडून पाकिस्तानात प्रवेश करणाऱ्या नागपूरमधील सुनीता जामगडे (Sunita Jamgade ) या महिलेला पाकिस्तान रेंजर्सनी बीएसएफच्या स्वाधीन केले आहे. त्यानंतर बीएसएफने तपास केला आणि तिला अमृतसर पोलिसांच्या ताब्यात दिले. नागपूरची राहणारी ४३ वर्षीय सुनीता जामगडे ही महिला जम्मू-काश्मीरमधील कारगिलजवळील हंदरमन गावातून बेकायदेशीरपणे पाकिस्तानात घुसली होती. प्राथमिक तपासात असे दिसून आले की, ही महिला एका ख्रिश्चन धर्मगुरूला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेली होती. सुनीता तिच्या १२ वर्षांच्या मुलाला कारगिलमधील एका स्थानिक हॉटेलमध्ये एकटी सोडून गेली होती. (Sunita Jamgade )

हेही वाचा-Hybrid Terrorists : लष्कर-ए-तोयबाच्या दोन हायब्रिड दहशतवाद्यांचे आत्मसमर्पण !

भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू असताना महिलेच्या कृतीमुळे सीमा सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तान रेंजर्स यांच्यात परस्पर समन्वयानंतर त्यांना भारताकडे परत सोपवण्यात आले आहे. बीएसएफ आणि पाकिस्तान रेंजर्समधील ध्वज बैठकीमुळे या महिलेचे परत येणे शक्य झाले. (Sunita Jamgade )

हेही वाचा- “भारत काय करू शकतो आणि किती अचूकपणे करू शकते हे जगाने पाहिले” ; PM Narendra Modi यांचा पाकला पुन्हा इशारा

मिळालेल्या माहितीनुसार तिला पाकिस्तानातून परत भारतात पाठवण्यात आले. सध्या तिला नागपुरात आणण्यात आले आहे. पण ही सर्व प्रक्रिया घडत असताना सुनीताने तिच्या मोबाईलचा सर्व डेटा डिलिट केल्याचे समोर आले आहे. याच एका चुकीमुळे तिच्यावर पोलिसांना संशय आला आहे. आता नागपूर सायबर पोलिसांची तज्ज्ञ टीम सुनीताच्या मोबाईलचा डाटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. तिने नागपूरातील काही संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिली का? याचा तपासही पोलीस करत आहेत. तशी माहिती नागपूर पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी दिली. (Sunita Jamgade )

हेही वाचा- Indian Railways : २०३० पर्यंत प्रत्येक प्रवाशाला कन्फर्म तिकीट मिळणार ; जाणून घ्या काय आहे रेल्वेची योजना ?

प्राथमिक चौकशीत मुलाला बर्फ दाखवण्यासाठी कारगील येथे गेले, पैसे संपल्यावर तिथे नोकरी शोधली आणि पाकिस्तान गेली, अशी उडवाउडवीची उत्तरं ती देत असल्याचं पोलीस सांगत आहेत. तिचा मोबाईल डाटा तपासून सुनीता जामगडे हिच्या जबाबाची तपासणी केली जाणार आहे. सुनीता जामगडे हिने हेरगीरी केली का? नागपूरातील संघ मुख्यालय, दीक्षाभूमी, रेल्वे स्टेशन याबाबत संवेदनशील माहिती दिली का? याचा तपासही विविध तपास यंत्रणा करणार आहेत. तिच्यावर हेरगिरीचा गुन्हा दाखल झाला असून, पुढील चौकशी सुरु आहे. सुनीता सध्या भारतात परतली असली तरी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सुनीता जामगेडे या महिलेने मोबाईल नेमका कशासाठी format केला? BSF ची सुरक्षा असताना सुनीताने LOC पार कशी केली? असे प्रश्न उपस्थित झाले असून आता या प्रश्नांची उत्तरं शोधली जाणार आहेत. (Sunita Jamgade )

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.