INS विक्रांतवर ‘तेजस’चे यशस्वी लँडिंग

116

भारतीय नौदलाची विमानवाहू युद्ध नौका आयएनएस- विक्रांतच्या फ्लाइट डेकवर तेजस या लढाऊ विमानाने यशस्वी लँडिंग केले आहे. यापूर्वी तेजसने जानेवारी 2020 मध्ये आयएनएस विक्रमादित्य या युद्धनौकेवर यशस्वी लँडिंग केले होते. परंतु, आयएनएस विक्रांतवरील विमानाचे हे पहिले लँडिंग असून याद्वारे या युद्धनौकेने एक मैलाचा दगड पार केला आहे.

( हेही वाचा : मुंबईकरांच्या मानसिक आरोग्याचेही होणार सर्वेक्षण : नायर रुग्णालयाची केली निवड )

भारतातील सर्वात मोठी युद्धनौका

यानिमित्ताने भारतीय नौदलाने आत्मनिर्भर भारतच्या दिशेने एक ऐतिहासिक टप्पा गाठला. कारण, नौदल वैमानिकांनी आयएनएस विक्रांतवर एलसीएचे लँडिंग केले. या स्वदेशी विमानाचे डिझाईन, विकास, बांधकाम आणि संचालन करण्याची हिंदुस्थानची क्षमता दर्शवते. असे, नौदलाकडून जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. सुमारे 20 हजार कोटी रूपये खर्चून बांधलेली आयएनएस विक्रांत ही 45 हजार टन वजनी युद्धनौका गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कार्यान्वित झाली होती. आयएनएस विक्रांत ही भारतातील सर्वात मोठी युद्धनौका असून तिची लांबी 262 मीटर आणि रुंदी 62 मीटर आहे. तसेच मिग-29 के लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरसह 30 विमाने वाहून नेण्यास सक्षम असलेल्या या युद्धनौकेत जवळपास 1,600 कर्मचारी राहू शकतात. भारत-पाकिस्तान यांच्यातील 1971च्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विक्रांत नौकेच्या नावावरूनच या नव्या युद्धनौकेचे नाव ठेवण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.