श्रीलंकेने त्याच्या त्रिंकोमाली बंदराजवळ पाकिस्तानच्या नौदलासोबत होणारा सराव भारताच्या (India) आक्षेपानंतर रहित केला. (SL-Pak Naval Drill) या सरावाची माहिती मिळाल्यानंतर भारताने कोलंबोतील उच्चायुक्तालयाच्या माध्यमातून श्रीलंका सरकारशी बोलून हा सराव रहित करण्यास सांगितले. भारतीय अधिकार्यांनी या संपूर्ण प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
त्रिंकोमाली बंदराजवळ (Trincomalee Harbour) भारताच्या साहाय्याने ऊर्जा केंद्र बांधले जात आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या नौदलाच्या या बंदराजवळ सरावावर भारताचा आक्षेप होता. त्यानंतर पाकिस्तानचा सराव रहित करण्याला विरोध असूनही श्रीलंकेने भारताच्या दबावामुळे हा सराव रहित करण्याचा निर्णय घेतला.
श्रीलंकेने परदेशी संशोधन नौकांच्या आगमनावर वर्षभरासाठी बंदी घातली आहे. चीनच्या हेरगिरी करणार्या नौकांमुळे ही बंदी घालण्यात आली होती. (SL-Pak Naval Drill)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community