“जर त्यांनी(पाकिस्तानने) पुन्हा भारतावर हल्ला केला तर ते स्वतःची परिस्थिती आणखी वाईट करतील”, अशा शब्दांत काँग्रेस नेते शशी थरुर(Shashi Tharoor) यांनी इशारा दिला. ते पुढे म्हणाले, भारत कुठल्याही चिथावणीला घाबरत नसून त्यालाही जोरदार प्रत्युत्तर देईल. गयाना येथील राजनैतिक मंचावर खासदार शशी थरुर(Shashi Tharoor) यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत दहशतवादाविरुद्धचा राष्ट्रीय एकमत आणि ठाम दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडला.(Shashi Tharoor)
काँग्रेस खासदार शशी थरूर(Shashi Tharoor) यांनी पाकिस्तानला कडक इशारा देत म्हटले की, भारत कोणत्याही चिथावणीला जोरदार प्रत्युत्तर देईल. गयाना येथे एका राजनैतिक मंचावर ते म्हणाले, भारत शांततेवर दृढ विश्वास ठेवतो. पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर अलिकडेच केलेले हल्ले पूर्णपणे सूड म्हणून केले गेले होते असे सांगतानाच भारताला युद्ध नको आहे, अशी परखड भूमिका थरूर(Shashi Tharoor) यांनी यावेळी मांडली.
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईबाबत बोलताना ते म्हणाले, ऑपरेशन अंतर्गत भारताने केलेली प्रत्युत्तर कारवाई ही एक प्रकारे दीर्घकाळ चालणारी युध्दाची सुरूवात नव्हती. भारतीय सैन्यदलांचा प्रत्येक हल्ला हा प्रत्युत्तरात्मक होता, भारताने केलेली प्रत्येक कारवाई केवळ पाकिस्तानला प्रत्युत्तर म्हणून होती. यामाध्यमातून भारताने संपूर्ण जगात हाच संदेश दिला की भारताला युद्धात रस नाही, अशी स्पष्ट भूमिका खासदार शशी थरुर(Shashi Tharoor) यांनी मांडली.
भारत सरकारच्या ०७ सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळांचे नेतृत्व पुढीलप्रमाणे : –
शशी थरूर, कॉंग्रेस
रविशंकर प्रसाद, भाजप
संजय कुमार झा, जदयू
बैजयंत पांडा, भाजप
कनिमोळी करुणानिधी, द्रमुक
सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस
श्रीकांत एकनाथ शिंदे,शिवसेना
०७ मे रोजी सुरू झालं ‘ऑपरेशन सिंदूर’
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी भारतीय सैन्यदलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ हाती घेतले. ७ मे रोजी सुरू झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर लक्ष्यित हल्ले केले. या हल्ल्यात पाकिस्तानातील ०९ दहशतवादी तळं आणि १००हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्या आला होता. ऑपरेशनचा उद्देश्य केवळ जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन यांसारख्या दहशतवादी नेटवर्कना नेस्तानाबूत करणे होता.(Shashi Tharoor)