पाकिस्तानी लष्करप्रमुखांच्या विचारांत आणि वागण्यात धार्मिक कट्टरता स्पष्टपणे दिसून येते, असे विधान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर(S Jaishankar) यांनी नेदरलँड्सच्या माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत केले. पाकिस्तानी लष्कराच्या विचारांत धार्मिक कट्टरता दिसून येते. यावेळी बोलताना परराष्ट्रमंत्र्यानी पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या विधानाचाही उल्लेख केला.
(हेही वाचा पाकिस्ताननंतर आता Bangladesh ला आली भारतविरोधात खुमखुमी; चीनचे तळवे चाटत युनूस सरकार कोणता रचतोय डाव? )
दरम्यान, पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी आपल्या भाषणात काश्मीरला पाकिस्तानच्या ‘गळाची नस’ संबोधले होते. तसेच, पाकिस्तानी नागरिक हिंदूपेक्षा वेगळे आहेत हे कधीही विसरु शकत नाहीत, असेही परराष्ट्रमंत्री म्हणाले. त्याचबरोबर, फाळणी का झाली हे मुलांना समजावे म्हणून मुनीर यांनी जिनांच्या द्विराष्ट्र सिद्धांताची कहाणी मुलांना सांगण्याची वकिली केली होती, असेही त्यांनी सांगितले.
(हेही वाचा “…तर आम्ही त्यांना जिथे असतील तिथेच ठोकणार”; परराष्ट्रमंत्री S Jaishankar यांचा स्पष्ट इशारा )
ते पुढे म्हणाले, या घटनेनंतर अवघ्या ५ दिवसांनी पहलगाम दहशतवादी हल्ला झाला. हा हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केला होता आणि त्यांनी निष्पाप लोकांना त्यांचा धर्म विचारून मारल्याचेही परराष्ट्रमंत्री जयशंकर(S Jaishankar) यांनी सांगितले. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारताने स्पष्टपणे सांगितले की जर पाकिस्तानला गोळीबार थांबवायचा असेल तर त्यांना भारतीय जनरलला फोन करून त्याबद्दल सांगावे लागेल, असेही एस. जयशंकर यावेळी म्हणाले.(S Jaishankar)
Join Our WhatsApp Community