S Jaishankar on POK : भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात केलेली कारवाईचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री S Jaishankar यांनी यासंदर्भात मोठं भाष्य केले असून ते म्हणाले, पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधा नष्ट करून भारतीय सैन्यदलाने ठरविलेले उद्दिष्ट साध्य केले आहे. तसेच, ऑपरेशन सिंदूरअंतर्गत महत्त्वाची उद्दिष्टे साध्य झाली असल्याने मला वाटते की आपण योग्य भूमिका घेतली, असेही एस. जयशंकर म्हणाले.
ते पुढे म्हणाले, ऑपरेशनच्या माध्यमातून ठरलेल्यानुसार, आम्ही पाकिस्तानातील दहशतवादी पायाभूत सुविधांवर हल्ला केला. याबाबत आम्ही आधीच म्हटलं होतं की, भारताची कारवाई फक्त दहशतवाद्यांविरोधातच असेल पाकिस्तानी लष्करावर नाही. त्यामुळे पाकिस्तानी लष्कराकडे वेगळे उभे राहून हस्तक्षेप न करण्याचा पर्याय आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
(हेही वाचा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचा अॅपल सीईओ टीम कुक यांना सल्ला; म्हणाले… )
भारताचा सल्ला पाकिस्तानने न घेण्याचा निर्णय घेतल्याने दि. १० मे रोजी सकाळी पाकिस्तानला जोरदार फटका बसल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले. सॅटलाईट छायाचित्रांवरून दिसून येते की, भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानचे किती नुकसान केले. त्यामुळे गोळीबार थांबविण्याची कुणाची इच्छा होती हे स्पष्ट आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सिंधू कराराबाबत बोलताना परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले, सिंधू पाणी करार स्थगित असून जोपर्यंत पाकिस्तानकडून सीमेपलीकडून होणारा दहशतवाद विश्वासार्ह आणि अपरिवर्तनीयपणे थांबत नाही तोपर्यंत तो स्थगित राहील. काश्मीरवर चर्चा करायची असलेली एकमेव गोष्ट म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधील बेकायदेशीरपणे व्यापलेला भारतीय भूभाग रिकामा करणे; आम्ही त्या चर्चेसाठी तयार आहोत,” असे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सांगितले. S Jaishankar