“…तर आम्ही त्यांना जिथे असतील तिथेच ठोकणार”; परराष्ट्रमंत्री S Jaishankar यांचा स्पष्ट इशारा

जर दहशतवादी पाकिस्तानात असतील तर आम्ही त्यांना जिथे असतील तिथेच मारू, असा स्पष्ट इशारा पराराष्ट्रमंत्री एस. जयशंकर(S Jaishankar) यांनी दिला. भारताच्या दहशतवादाविरोधी भूमिकेवर बोलताना परराष्ट्रमंत्री म्हणाले, ऑपरेशन सिंदूर सुरूच असून पहलगामसारखा आणखी दहशतवादी हल्ला झाल्यास भारत चोख प्रत्युत्तर देईल. तसेच, जर दहशतवादी पाकिस्तानातून कारवाया करत असतील तर त्यांना लक्ष्य केले जाईल, असेही परराष्ट्रमंत्री यांनी सांगितले.(S Jaishankar)

88

(हेही वाचा ‘Operation Sindoor’मध्ये ३ हजार अग्निवीरांची महत्त्वाची भूमिका; “पाकिस्तानी क्षेपणास्त्र आणि ड्रोन…” )

नेदरलँड्सस्थित एनओएसला दिलेल्या मुलाखतीत बोलताना परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादबाबत भारताची भूमिका मांडली. यावेळी परराष्ट्रमंत्र्यांनी दहशतवादाचा सामना करण्यासंदर्भात भारताची भूमिका स्पष्ट केली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद नियमितपणे एक यादी जारी करते, ज्यामध्ये प्रमुख दहशतवाद्यांबद्दल आणि त्यांच्या निवासस्थानाबद्दल आणि ते कुठून काम करतात याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते, असे सांगतानाच भारताने संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या यादीतील दहशतवादी तळांना लक्ष्य केले आहे, असेही एस. जयशंकर म्हणाले.

ते पुढे म्हणाले, ऑपरेशन सिंदूर सुरूच असून पहलगाम दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती झाल्यास त्याला तितकेच कडक प्रत्युत्तर दिले जाईल. जर दहशतवादी पाकिस्तानमध्ये असतील तर आम्ही त्यांना ते जिथे असतील तिथेच मारू, हाच ऑपरेशन सिंदूर सुरू ठेवण्याचा उद्देश आहे. परंतु, ऑपरेशन सुरू ठेवणे म्हणजे एकमेकांवर गोळीबार करणे नाही, अशी परखड भूमिका डॉ. एस. जयशंकर(S Jaishankar) यांनी मांडली.

पर्यटकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना भारताने पकडले का?

जयशंकर म्हणाले, “मला वाटते की आम्ही ते कोण होते हे आम्ही ओळखू शकलो, कारण त्यांचे फोटो आमच्या हाती लागले. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतलेली ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ संघटना अनेक वर्षांपासून आमच्या रडारवर होती. २०२३, २०२४ आणि २०२५ मध्ये भारताने ही संघटना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या १२६७ निर्बंध समितीसमोर आणली होती. तसेच, लष्कर हा पाकिस्तानमधील मुख्य दहशतवादी गट असून या दोन मुख्य दहशतवादी गटांचा संबंध दिसून आला आहे, असेही परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यावेळी म्हणाले.(S Jaishankar)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.