Russia-Ukraine War : रशियाच्या हवाई तळांवर आणि लष्करी विमानांवर मोठा ड्रोन हल्ला

Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युध्द(Russia-Ukraine War) आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात असून युक्रेनने रशियाच्या हवाई तळ आणि लष्करी विमानांवर मोठा ड्रोन हल्ला केला आहे. या ड्रोन हल्ल्यात ४० हून अधिक रशियन बॉम्बर्स, ओलेन्या आणि बेलाया हवाई तळांना लक्ष्य करण्यात आले. युक्रेनने एफपीव्ही ड्रोनने रशियाच्या हवाई आणि लष्करी तळांना लक्ष्य केले आहे.(Russia-Ukraine War)

67

(हेही वाचा All Party Delegation : ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देणाऱ्या शिष्टमंडळाच्या दौऱ्याबाबत शशी थरुर यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…. )

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, युक्रेनच्या एफपीव्ही ड्रोन हल्ल्यात रशियाने युक्रेनवर लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा मारा करण्यासाठी वापरलेल्या स्ट्रॅटेजिक बॉम्बर विमाने टीयू-९५ आणि टीयू-२२ लक्ष्य करण्यात आले आहे. रॉयटर्सशी बोलताना युक्रेनियन अधिकाऱ्याने सांगितले की, युक्रेनच्या देशांतर्गत सुरक्षा एजन्सी एसबीयूने हा ड्रोन हल्ला केला आहे.(Russia-Ukraine War)

(हेही वाचा IDF : ‘आम्ही सर्व ओलिसांना परत करू, तुम्ही बॉम्बहल्ले थांबवा’; गाझा प्रमुख ठार झाल्यानंतर हमासची नरमाईची भूमिका )

विशेष म्हणजे सद्यस्थितीस युक्रेनची सुरक्षा सेवा रशियन फेडरेशनच्या मागील बाजूस बॉम्बर विमानांना नष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विशेष ऑपरेशन करत आहे. एसबीयू ड्रोन दररोज रात्री युक्रेनियन शहरांवर बॉम्ब टाकणाऱ्या विमानांवर सराव करत असल्याचेही समोर आले आहे. तसेच, ए-५०, टीयू-९५ आणि टीयू-२२ एम३ यासह ४० हून अधिक विमानांना ड्रोनने धडक देण्यात आली,” असे कीव इंडिपेंडेंटने एसबीयूच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.(Russia-Ukraine War)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.