दक्षिण आशियात भारत-पाकिस्तान तणाव सुरू असताना Russia-Ukraine War यासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी युध्दबंदीसंदर्भात सूचक ट्विट केले आहे. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, रशियाने अखेर युद्ध संपवण्याचा विचार सुरू केला आहे हे एक सकारात्मक संकेत आहे. संपूर्ण जग खूप दिवसांपासून याची वाट पाहत आहे, अशा आशयाचे ट्विट झेलेन्स्की यांनी केले. तर दुसरीकडे, सीएनएन नुसार, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी इस्तंबूलमध्ये युक्रेनशी थेट चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
(हेही वाचा भारत पाकिस्तान यांच्यातील संघर्षात China ची डबल ढोलकी; भारताला सल्ला पण पाकिस्तानला पाठिंबा )
दरम्यान, कोणत्याही युद्धाचा खऱ्या अर्थाने अंत करण्यासाठी पहिले पाऊल म्हणजे युद्धबंदी. असे सांगतानाच एका दिवसासाठीही युध्दपात सुरू ठेवण्यात काही अर्थ नाही. आम्हाला अपेक्षा आहे की रशिया उद्या, १२ मे पासून पूर्ण, टिकाऊ आणि विश्वासार्ह युद्धबंदीची पुष्टी करेल. तसेच, युक्रेन भेटण्यास तयार आहे, असेही राष्ट्राध्यक्ष झेलन्स्की यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, यापूर्वी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे की रशिया युक्रेनशी ‘प्रत्यक्ष चर्चेसाठी’ तयार आहे. अमेरिका आणि युरोपीयन नेते युद्धबंदीसाठी दबाव आणत असताना युध्दबंदीचे सुतोवाच करण्यात येत आहेत.
युनायटेड किंग्डम, फ्रान्स, जर्मनी आणि पोलंडमधील युरोपीय नेत्यांनी कीवला भेट देऊन १२ मे पासून पूर्ण आणि बिनशर्त युद्धबंदीचे आवाहन केल्यानंतर युध्दबंदीची शक्यता वर्तविली जात आहे. युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी यावर भर दिला की युद्धबंदी सर्व क्षेत्रे, जमीन, समुद्र आणि हवाई, आणि किमान ३० दिवस चालली पाहिजे. ब्रिटनचे पंतप्रधान क्वीर स्टारमर, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जर्मन चांसलर फ्रेडरिक मर्झ आणि पोलिश पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी शांतता, सार्वभौमत्व आणि स्वतंत्र आणि युरोपीय राष्ट्र म्हणून युक्रेनच्या भविष्याचे महत्त्व अधोरेखित केले होते. Russia-Ukraine War
Join Our WhatsApp Community