Russia Attacked on Ukraine : मागील तीन दिवसांत रशिया(Russia Attacked on Ukraine)ने युक्रेनवर जोरदार हवाई हल्ला केला. रशियाने गेल्या तीन दिवसांत ५००हून अधिक हवाई करत युक्रेनमधील खारकीव शहराला लक्ष्य केले. तब्बल ९ मिनिटांच्या ड्रोन हल्ल्यात ०६ जणांचा मृत्यु तर ६४ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली होती. यात ०९ मुलांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.(Russia Attacked on Ukraine)
दरम्यान, यु्क्रेनने ०१ जून रोजी केलेल्या हल्ल्याला रशियाने चोख प्रत्युत्तर दिले आहे. हल्ल्याचा बदला घेण्यासाठी केल्या गेलेल्या या प्रत्युत्तरात खारकीवमध्ये ९ मिनिटे सतत क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला. रशिया-युक्रेन संघर्षा(Russia Attacked on Ukraine)त रशिया आपल्या अटींवर ठाम असून दोन्ही देशांत शांततेची आशा अजूनही दूर आहे.
(हेही वाचा कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांनी पुन्हा ओकली गरळ; म्हणाले, Operation Sindoor हे लहान मुलांच्या… )
दरम्यान, उभय देशांमधील संघर्षात तब्बल १,२१२ युक्रेनियन सैनिकांचे मृतदेह रशियाकडून परत करण्यात आले आहेत. दोन्ही देशांत शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. इस्तंबूल येथे झालेल्या शांतता चर्चेदरम्यान करारदेखील करण्यात आले. याच कराराचा भाग असलेल्या अटीनुसार रशियाकडून ओलीसांना सोडण्याबाबत सहमती झाली होती. तथापि, इस्तंबूलमध्ये झालेल्या चर्चेच्या दोन्ही फेऱ्यांचा काहीच उपयोग झाला नाही. उलटपक्षी दोन्ही देशांतील संघर्ष अधिक चिघळताना दिसून येत आहे. त्यामुळे चर्चेच्यानंतरही उभय देशांमधील युद्धाचा अद्याप शेवट झालेला नाही. कैद्यांची देवाणघेवाण आणि सैनिकांचे मृतदेह परत करणे हे या चर्चेचे एकमेव ठोस परिणाम आहेत.
युक्रेनियन सरकारने सांगितले की, रशियाने परत केलेल्या मृतदेहात खारकीव, लुगान्स्क, डोनेत्स्क, झापोरिझिया आणि खेरसन सारख्या भागात मारल्या गेलेल्या सैनिकांचे अवशेष परत देण्यात आले. तसेच, रशिया(Russia Attacked on Ukraine)च्या कुर्स्क प्रदेशात युक्रेनच्या प्रतिहल्ल्यात देखील अनेक नागरिक मारले गेल्याची माहिती समोर आली होती. तथापि, इस्तंबूलमध्ये झालेल्या चर्चेच्या दोन फेऱ्यानंतरही अद्याप युद्ध संपले नाही.
याआधी १ जूनला युक्रेनने रशियावर एक मोठा ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यास ‘ऑपरेशन स्पायडरवेब’ असे नाव देण्यात आले. या हल्ल्यात युक्रेनने रशियाच्या अणु-सक्षम लांब पल्ल्याच्या बॉम्बरला लक्ष्य केल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर
रशियन लष्कराचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले गेले.(Russia Attacked on Ukraine)
Join Our WhatsApp Community