Russia Attack on Ukraine : युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! ४७९ ड्रोनसह विविध क्षेपणास्त्रांचा रशियाकडून वर्षाव

Russia Attack on Ukraine : रशिया-युक्रेन यांच्यातील संघर्षात दिवसेंदिवस वाढ होत असून आता रशिया(Russia Attack on Ukraine)ने युक्रेनवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला.

113

Russia Attack on Ukraine : रशिया-युक्रेन यांच्यातील संघर्षात दिवसेंदिवस वाढ होत असून आता रशिया(Russia Attack on Ukraine)ने युक्रेनवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला. ४७९ ड्रोनसह विविध क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने केलेला हल्ला हा युक्रेनवरील सर्वात मोठा हल्ला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ४००हून अधिक ड्रोनसह विविध क्षेपणास्त्रे रशियाने एका रात्रीत युक्रेनवर डागली आहेत. विशेष म्हणजे, आतापर्यंतचा एका रात्रीतील रशियाचा हा सर्वात मोठा हल्ला आहे.(Russia Attack on Ukraine)

(हेही वाचा ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये चोख भूमिका बजावल्यानंतर डीजीएमओ Lt Gen Rajiv Ghai आता लष्कराचे रणनिती उपप्रमुख )

दरम्यान, रशिया-युक्रेन संघर्ष सुरू झाल्यापासून रशियाचा हा सर्वात मोठा हल्ला असल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेनच्या हवाई दलाने म्हटले की, रशिया(Russia Attack on Ukraine)ने ड्रोन हल्ल्यांव्यतिरिक्त विविध प्रकारची २० क्षेपणास्त्रे वेगवेगळ्या भागात डागली. या हल्यात युक्रेनच्या मध्य आणि पश्चिम प्रदेशांतील भागांना लक्ष्य करण्यात आले, अशीही माहिती समोर आली आहे.

(हेही वाचा Operation SINDOOR : भारताचे संरक्षण प्रमुख सांगतात, युद्धामध्ये क्षति झाली होती )

युक्रेनियन हवाई दलाच्या दाव्यानुसार, रशियाच्या फक्त १० ड्रोन व काही क्षेपणास्त्रांनी युक्रेनवरील लक्ष्यांवर हल्ला केला. या दाव्यावर रशियाकडून अद्याप कुठलेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. दरम्यान, रशियाच्या हवाई हल्ल्यात युक्रेनवर ड्रोन्स व क्षेपणास्त्रांचा मोठा मारा करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे या संघर्षात रशियाने युक्रेनच्या नागरी भागांवर वारंवार ड्रोन हल्ला केला. संयुक्त राष्ट्रांच्या दाव्यानुसार, रशिया-युक्रेन संघर्षात युक्रेनचे १२ हजारांहून अधिक नागरिक मारले गेले.(Russia Attack on Ukraine)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.