Ramban Indian Army Accident : जम्मू-काश्मीरमध्ये सैन्याचे वाहन दरीत कोसळले ; ३ जवान हुतात्मा

Ramban Indian Army Accident : जम्मू-काश्मीरमध्ये सैन्याचे वाहन दरीत कोसळले ; ३ जवान हुतात्मा

64
Ramban Indian Army Accident : जम्मू-काश्मीरमध्ये सैन्याचे वाहन दरीत कोसळले ; ३ जवान हुतात्मा
Ramban Indian Army Accident : जम्मू-काश्मीरमध्ये सैन्याचे वाहन दरीत कोसळले ; ३ जवान हुतात्मा

जम्मू-काश्मिरातील रामबन (Ramban Indian Army Accident ) जिल्ह्यातील बॅटरी चष्मा भागात रविवारी लष्कराचे एक वाहन ६०० मीटर खोल दरीत कोसळले. या अपघातात तीन सैनिक हुतात्मा झाले आहेत. लष्कर, पोलिस, एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन बचावकार्य करत आहेत. (Ramban Indian Army Accident )

यापूर्वी ४ जानेवारी रोजी बांदीपोरा जिल्ह्यात लष्कराचा ट्रक खड्ड्यात कोसळल्याने चार जवान हुतात्मा झाले होते. २ सैनिक गंभीर जखमी झाले. ट्रकमध्ये फक्त ६ सैनिक होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा अपघात जिल्ह्यातील एसके पायीन भागात झाला होता. (Ramban Indian Army Accident )

पंतप्रधान नरेंद्र मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक
एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या ७ लोक कल्याण मार्ग येथील निवासस्थानी भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान आणि एअर चीफ मार्शल यांच्यात चर्चा झाली. (Ramban Indian Army Accident )

दोन पाकिस्तानी हेरांना अटक
पंजाबच्या अमृतसर पोलिसांनी रविवारी दोन हेरांना अटक केली. पोलिसांनी सांगितले की दोघेही परदेशात लष्करी छावण्या आणि हवाई दलाच्या तळांची माहिती आणि छायाचित्रे पाठवत होते. हे दोघेही पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे कार्यकर्ते आहेत. (Ramban Indian Army Accident )

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.