काश्मीरमधून सुरक्षा दलांची माहिती पाकिस्तानला (Pakistan) पाठवणाऱ्यांवर जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) राज्य तपास संस्थेने (SIA) ११ मे या दिवशी छापे घातले. या वेळी लष्कर-ए-तौयबा, जैश-ए-महंमदच्या इशाऱ्यावर भारतविरोधी प्रचार करणाऱ्या अनेकांना पकडण्यात आले. एसआयएने दक्षिण काश्मीरमधील २० ठिकाणी छापे टाकले. व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि सिग्नल अॅप सारख्या मेसेजिंग अॅप्सद्वारे सुरक्षा दलांची आणि महत्त्वाच्या ठिकाणांची संवेदनशील माहिती शेअर केल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली.
(हेही वाचा – India Pakistan War : “हमने भेजे कश्मीर में मुजाहिद…”; अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा बुरखा फाटला)
एसआयएने अनेक लोकांना ताब्यात घेतले आणि आक्षेपार्ह साहित्य जप्त केले. एजन्सीचे म्हणणे आहे की, हे लोक पाकिस्तानमध्ये बसलेल्या हँडलर्सच्या संपर्कात होते आणि लष्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba) आणि जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनांच्या आदेशानुसार भारतविरोधी प्रचार करत होते. पुलवामा, शोपियान, कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यात हे छापे टाकण्यात आले.
बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत (UAPA) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसआयएने म्हटले आहे की, हे दहशतवादी कारस्थान देशाच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला आव्हान देण्याचा, तसेच सामाजिक अशांतता आणि जातीय द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. तपासात अनेक महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत आणि ताब्यात घेतलेल्या लोकांची चौकशी सुरू आहे. (Pakistan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community