भारतीय संरक्षण दलासाठी महत्त्वाची बातमी; Rafale Fighter Jet आता भारतात बनणार

55
भारतीय संरक्षण दलासाठी महत्त्वाची बातमी; Rafale Fighter Jet आता भारतात बनणार

भारतीय संरक्षण दलांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. फ्रान्सचे राफेल हे लढाऊ विमानाची निर्मिती आता भारतातच केली जाणार आहे. राफेल लढाऊ विमानांचे (Rafale Fighter Jet) फ्युझलाज (मुख्य ढाचा) पहिल्यांदाच फ्रान्सच्या बाहेर तयार होणार आहे. यासाठी डसॉल्ट एव्हिएशन आणि भारतातील टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड (टीएएसएल) यांच्यात करार झाले आहेत. एकूण 4 उत्पादन हस्तांतरण करारांनंतर हैदराबादमध्ये एक विशेष उत्पादन केंद्र उभारण्यात येणार आहे.

फ्युझलाज म्हणजे विमानाचा तो भाग ज्यामध्ये पायलट, प्रवासी किंवा उपकरणे असतात. यालाच विमानाची मुख्य फ्रेम किंवा बॉडी म्हणता येईल. तर विमानाच्या इतर भागांमध्ये विग्ज (पंख) कॉकपिट, टेल (शेपूट) आणि इंजिन याचा समावेश होतो. राफेलचा फ्युझलाज तयार करणे म्हणजे त्या संपूर्ण विमानाच्या बांधणीतील सर्वात मोठा आणि तांत्रिक दृष्ट्या महत्त्वाचा भाग भारतात तयार होणार आहे. ही केवळ संरक्षण उत्पादनक्षेत्रातील प्रगतीच नव्हे तर भारत-फ्रान्स संबंधातील दृढ विश्वासाचे प्रतीक मानले जात आहे. डसॉल्ट एव्हिएशन आणि टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड यांनी 4 उत्पादन हस्तांतरण करारांवर स्वाक्षऱ्या करत भारतात राफेल लढाऊ विमानांचे (Rafale Fighter Jet) फ्युझलाज (विमानाचे मुख्य ढाचे) तयार करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा – बकरी ईदसाठी Mumbai Local मधून बकऱ्यांची अवैध वाहतूक; प्रवाशांकडून संताप व्यक्त)

या करारानुसार भारतात, विशेषतः हैदराबादमध्ये, एक स्वतंत्र उत्पादन सुविधा स्थापन होणार आहे आणि ती केवळ भारतासाठीच नव्हे तर आंतरराष्ट्रीय मागणीसाठीही फ्युझलाज पुरवणार आहे. ही बाब विशेषत्वाने महत्त्वाची ठरते कारण ही फ्रान्सबाहेरची पहिली राफेल फ्युझलाज उत्पादन सुविधा आहे. या प्रकल्पामुळे भारताच्या ‘मेक इन इंडिया’ आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेला मोठा चालना मिळणार आहे. हैदराबाद येथील या प्रकल्पात राफेल लढाऊ विमानाचे (Rafale Fighter Jet) पुढचे भाग, मध्यभाग, मागचा भाग आणि साइड शेल्स यांचा समावेश असलेले संपूर्ण फ्युझलाज तयार केले जातील. वित्तीय वर्ष 2028 पासून उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे आणि दरमहा 2 पूर्ण फ्युझलाज तयार करण्याची क्षमता या केंद्राकडे असेल.

यावेळी डसॉल्ट एव्हिएशनचे चेअरमन व सीईओ एरिक ट्रापियर म्हणाले की, “भारतामध्ये आमची पुरवठा साखळी अधिक मजबूत करण्याचा हा निर्णायक टप्पा आहे. टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्ससारख्या स्थानिक भागीदारांमुळे आमच्या दर्जात्मक व स्पर्धात्मक गरजा पूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले. तर टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्सचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालक सुकरण सिंग म्हणाले की, “भारताच्या एअरोस्पेस क्षेत्राच्या प्रवासातील हा एक ऐतिहासिक क्षण आहे. भारतात संपूर्ण राफेल (Rafale Fighter Jet) फ्युझलाजची निर्मिती ही आमच्या कंपनींमधील विश्वासाचे द्योतक आहे आणि भारतात आधुनिक एअरोस्पेस उत्पादन क्षमता विकसित होत असल्याचे सिद्ध करते असे सिंग म्हणालेत.

(हेही वाचा – Churchgate Station Fire: रेल्वेस्थानकातील दुकानाला लागलेली आग आटोक्यात; धूर पसरल्याने प्रवाशांची पळापळ)

राफेल हे ड्युअल इंजिन, मल्टी-रोल लढाऊ विमान (Rafale Fighter Jet) असून त्याची लढाऊ कामगिरी जागतिक स्तरावर मान्य झाली आहे. 2016 मध्ये भारताने 36 राफेल विमाने खरेदी करण्यासाठी सुमारे 7.87 अब्ज युरोंचा करार केला होता. ही विमाने सध्या भारताच्या पश्चिम व पूर्व सीमेवर तैनात आहेत.या कराराअंतर्गत काही ‘ऑफसेट’ अटी होत्या, ज्या अंतर्गत डसॉल्टने भारतात गुंतवणूक करणे आवश्यक होते. हैदराबाद प्रकल्प ही त्याच अटींची सर्वात महत्त्वाची फलश्रुती मानली जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.