पहलगाम येथे धर्म विचारून हिंदू असलेल्या पर्यटकांना दहशतवाद्यांनी (Terrorist) केलेल्या गोळीबारचा गुरुवारी कळमनुरीत शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला असून केंद्राने आता दहशतवाद्यांना धडा शिकविण्याची मागणी करण्यात आली.
कळमनुरी येथील बस स्थानकाजवळ आयोजित निषेध मोर्चाला आमदार संतोष बांगर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राम कदम, रेखा देवकते, राजेंद्र शिखरे, अभय सावंत, बबलू पत्की यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर दहशतवाद्यांचा (Terrorist) प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. केंद्रशासनाने दहशतवाद्याचा बिमोड करून पाकिस्तानने धडा शिकवावा, अशी मागणी करण्यात आली.
(हेही वाचा Turkey aid to Pakistan : पाकिस्तानला तुर्कीची मदत; सहा मालवाहू विमाने भरून शस्त्रसामुग्री पाठवली)
हिंगोली येथे ही शिवसेनेच्या वतीने दहशतवादी (Terrorist) हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी श्रीराम बांगर, लखन कुरील, दीपक निमोदिया, संजय खंडेलवाल, महेश चक्रवार, प्रतीक अग्रवाल आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.