PM Narendra Modi यांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण

181

नौदल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे सोमवार, ४ डिसेंबर रोजी सिंधुदुर्गात दाखल झाले. त्यांनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील उपस्थिती होती. पंतप्रधान मोदी यांनी पुतळ्याचे अनावर केल्यानंतर आर्ट गॅलरीची देखील पाहणी केली. त्यानंतर PM Modi यांचा ताफा नौदल दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाकडे वळाला. तारकर्ली बीचवर नौदलाच्या प्रदर्शनाकडे त्यांचा ताफा निघाला.

सागरी वारशाला आदरांजली

दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त नौदल प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यामध्ये नौदलाची जहाजे, पाणबुड्या आणि विमानांच्या ऑपरेशनल कामगिरीचा समावेश होतो. सामान्य लोकांनाही त्यात सहभागी होण्याची मुभा आहे, जेणेकरून त्यांना नौदलाच्या अधिकारांची माहिती मिळू शकेल. वास्तविक, सिंधुदुर्गात नौदल दिन 2023 साजरा करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी वारशाला आदरांजली वाहिली जाते.

(हेही वाचा BJP : एकाच वेळी दोन मुख्यमंत्र्यांचा पराभव करणारा भाजपचा तेलंगणातील कोण आहे ‘जायंट किलर’?)

43 फूट उंचीचा पुतळा

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळ असलेल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. तब्बल 43 फूट उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असून नौदलाने या पुतळ्याची उभारणी केली आहे. त्यामुळेच नौदल दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. गेल्या चार महिन्यांपासून राजकोट किल्ल्यावर पुतळा उभारण्याचे काम सुरू होते. अखेर आज पंतप्रधानांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण झाले.

INS विक्रांत स्वदेशी विमानाचा समावेश

गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी पहिले स्वदेशी विमान INS विक्रांत नौदलात सामील करून घेतले होते. 6 मार्च 2022 रोजी पुणे महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरणही पंतप्रधान मोदींनी केले होते. ही 9.5 फूट उंचीची मूर्ती 1850 किलो गनमेटलपासून बनवण्यात आली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.