भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केवळ दहशतवादी ठिकाणांच लक्ष्य केले. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याकडून झालेल्या हल्ल्याचा भारतीय सैन्याने ८, ९ मे हे दोन दिवस जोरदार प्रतिहल्ला केला. हा हल्ला इतका तीव्र होता की, पाकिस्तान (Pakistan) स्वतःहूनच शस्त्रसंधीसाठी चर्चा करण्याकरता फोन करू लागला. वास्तविक आम्ही याविषयी १२ मे रोजी चर्चा करण्याचे ठरवले होते, मात्र पाकिस्तान इतकेही दिवस थांबायला तयार नव्हता, त्यांनी त्याआधीच १० मे रोजी शस्त्रसंधीवर चर्चा करण्यासाठी फोन आला, अशी माहिती डीजीएमओ राजीव घई यांनी रविवार, ११ मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पाकिस्तानचे एकही विमान भारतीय हद्दीत प्रवेश करू शकले नाही
ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर दोन दिवस झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत भारतीय सैन्य दलाने केलेल्या कारवाईविषयी माहिती देण्यासाठी संरक्षण दलाच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांची संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी डीजीएमओ राजीव घई, एअर मार्शल अवधेश कुमार भारती, व्हॉइस ऍडमिरल ए एन प्रमोद हे अधिकारी उपस्थित होते. डीजीएमओ राजीव घई म्हणाले, दहशतवादी कारवाया करणारे आणि दहशतवादी कारवाईचे कट रचणारे यांना शिक्षा करणे आणि त्यांची ठिकाणे उद्ध्वस्त करणे याच उद्देशासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवले, त्यानंतरच्या दोन दिवसांच्या कारवायांतही आम्ही पाकिस्तानच्या (Pakistan) कोणत्याही सैन्य तळाला अथवा नागरी ठिकाणांना लक्ष्य केले नाही. दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करणे या स्पष्ट लष्करी उद्दिष्टासह ऑपरेशन सिंदूरची संकल्पना करण्यात आली. भारत दहशतवाद सहन न करण्याचा दृढनिश्चयी आहे. पाकिस्तानी (Pakistan) सैन्याने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली नाही. त्यांची विमानेही भारताच्या हद्दीत येऊ शकली नाहीत. त्यांना तिथेच नियंत्रणात ठेवण्यात सैन्याला यश आले आहे, असेही डीजीएमओ घई म्हणाले.
पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय हवाई सेवा सुरु ठेवलेली
एअर मार्शल भारती म्हणाले, आजही शस्त्रू सैन्याला हल्ला करायचा असेल तरी आम्ही सर्व ताकदीनिशी तयार आहोत. पाकिस्तान जेव्हा भारतावर ड्रोन हल्ले करत होता, तेव्हा लाहोर विमानतळावर नागरी हवाई वाहतूकही सुरु ठेवली होती. त्यात न केवळ डोमेस्टिक विमान सेवा सुरु होती तर आंतरराष्ट्रीय विमान सेवाही सुरु ठेवली होती, त्यामुळे आम्हाला अतिशय सावधगिरीने कारवाई करावी लागली. पाकिस्तानचे (Pakistan) असे एकही ठिकाण नाही जिथे आम्ही लक्ष्य करू शकत नाही. आम्ही या कारवाईत सैन्याची तळे लक्ष्य करणार नव्हतो, पण ज्या एअर बेसवरून पाकिस्तान ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागत होता, त्यामुळे आम्ही ती नष्ट केली, असेही एअर मार्शल भारती म्हणाले.
पाकिस्तानच्या विमानांनी भारताच्या हद्दीत घुसून दाखवावे
आम्ही या कारवाईत कोणती शस्त्रे वापरली ती जाहीर करू शकत नाही पण जी शस्त्रे वापरली त्यांनी आमची लक्ष्ये अचूक भेदली आहेत, आमचे फक्त लक्ष्य भेदणे हाच उद्देश आहे आमच्या हल्ल्यातून किती मृत झाले यांची मोजणी करणे हे आमचे काम नाही, आम्ही पाकिस्तानची (Pakistan) विमाने पाडली आहेत, त्यांचा नंबर आमच्याकडे आहे, पण आम्ही त्याची माहिती देणार नाही. ही माहिती भविष्यात पुढे येईलच. पाकिस्तानच्या (Pakistan) विमानांना जर भारताच्या हद्दीत घुसण्याची इच्छा असेल तर त्यांनी तशी हिंमत दाखवावी, त्यांना धडा शिकवू, असेही एअर मार्शल भारती म्हणाले.
Join Our WhatsApp Community