पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) कॅनडात जी-७ शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदीं(PM Narendra Modi)च्या सहभागानंतर कॅनडातील खलिस्तानी आणि इस्लामिक दहशतवाद्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे. पंतप्रधानां(PM Narendra Modi)च्या दौऱ्याआधीच खलिस्तानी संघटना कुरापती करण्याचा कुटील डाव आखत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी पंतप्रधानांना बैठकीचे आमंत्रण दिले आहे.(PM Narendra Modi)
(हेही वाचा Mahayuti : मुख्यमंत्र्यांच्या आक्षेपानंतरही मंत्र्यांचा हट्ट कायम; खासगी सचिवांच्या नियुक्तीवरून महायुतीत ‘शीतयुद्ध’ )
विशेष म्हणजे, जगातील सात महत्त्वाच्या देशांचा समूह असलेल्या जी-७ शिखर बैठक कॅनडामध्ये होणार आहे. याच शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी(PM Narendra Modi)देखील कॅनडात दाखल होणार आहे. मार्क कार्नी यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यानंतर भारत-कॅनडा यांच्यात द्विपक्षीय संबंध सुधारले आहेत. त्यातच मागील काही वर्षांत कॅनडा खलिस्तानी आणि इस्लामिक दहशतवाद्यांसाठी आश्रयस्थान बनला असल्याचे दिसून आले.
कॅनडातील अल्बर्टा येथे होणाऱ्या शिखर परिषदेदरम्यान, पंतप्रधान मोदीं(PM Narendra Modi)च्या दौऱ्यावर खलिस्तानी दहशतवाद्यांनी मोठे निदर्शने व हल्ले करण्याची तयारी केल्याची माहिती समोर आली आहे. १६-१७ जून २०२५ दौऱ्यावेळी अनेक खलिस्तानी संघटना निदर्शने करण्याच्या तयारीत आहेत. यातील अनेक संघटना बऱ्याच काळापासून सक्रिय आहेत. खलिस्तानी मनवीर सिंग दुहडा, सुलिंदर सिंग विर्क व मलकीत सिंग फौजी सारखे खलिस्तानवाद्यांचा यात सहभाग असण्याची शक्यता आहे.(PM Narendra Modi)
Join Our WhatsApp Community