
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terrorist Attack) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी २.४५ वाजता बैसारन व्हॅली परिसरात ही घटना घडली. दहशतवाद्यांनी उत्तर प्रदेशातील शुभम द्विवेदीचे नाव विचारले आणि नंतर त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. यानंतर त्यांनी इतर लोकांवर गोळीबार केला आणि तेथून पळून गेले. लष्कर-ए-तैयबाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. (Pahalgam Terrorist Attack)
चौघेही पाकिस्तानी
निष्पाप पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या, गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा फोटो आता समोर आला आहे. पर्यटकांना नाव आणि धर्म विचारून त्यांच्यावरती गोळीबार करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा फोटो समोर आला आहे. चौघेही पाकिस्तानी असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून हा कट रचला जात होता. पाकिस्तानातून हे हल्लेखोर त्या ठिकाणी आले होते, त्या ठिकाणी असलेल्या स्लीपर सेलच्या मदतीने या हल्लेखोरांनी हल्ले केले. (Pahalgam Terrorist Attack)
रेखाचित्रे तयार …
या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. दहशतवाद्यांच्या चेहरा दिसणारा हा पहिला फोटो समोर आला आहे. काश्मिरमधील नागरिकांनी देखील या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. हल्लेखोरांचा हा फोटो समोर आल्याचं दिसून येत आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचे रेखाचित्र देखील पोलिसांनी जारी केले आहेत. त्या ठिकाणी असलेल्या पिडित पर्यटकांशी बोलून ही रेखाचित्रे तयार करण्यात आली आहेत. त्या दहशतवाद्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. (Pahalgam Terrorist Attack)
दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टर आणि ड्रोनचीही मदत
दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टर आणि ड्रोनचीही मदत घेतली जात आहे. यादरम्यानच पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशदवाद्यांचे स्केच जारी करण्यात आले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, सर्व लष्करी तुकड्यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर आणि अंतर्गत भागातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Pahalgam Terrorist Attack)
उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, २ दहशतवादी ठार
जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ बुधवारी दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. यानंतर भारतीय सैन्याने गोळीबार सुरू केला. ही चकमक अजूनही सुरू आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा दलांना २-३ दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करताना दिसले. या भागात शोध मोहीमही सुरू आहे. या कारवाईदरम्यान, दोन दहशतवादी मारले गेले आणि घुसखोरांकडे असलेली शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. (Pahalgam Terrorist Attack)
ऑपरेशन चालू आहे…
एका अधिकृत निवेदनानुसार, २३ एप्रिल रोजी सकाळी उत्तर काश्मीरमधील उरी नाल्याजवळील सरजीवन परिसरातून दोन ते तीन दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. “नियंत्रण रेषेवरील सतर्क सैन्याने घुसखोर गटाला आव्हान दिले आणि त्यांना रोखले, ज्यामुळे गोळीबार झाला,” असे लष्कराने सांगितले. ऑपरेशन सुरू आहे आणि अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे. (Pahalgam Terrorist Attack)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community