Operation Sindoor वरून रडगाणे गाताना पाकड्यांचा अमेरिकेत कबूलनामा; भारताकडून सर्व शक्तीनिशी हल्ला

70

ऑपरेशन सिंदूरवेळी (Operation Sindoor) भारतीय सैन्याने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये सैन्य कारवाई करताना 9 दहशतवादी तळ उडवून दिले. त्यानंतर पाकिस्तानी हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना त्यांचे 11 एअरबेस उडवले. भारताचा एअर डिफेन्स आणि सैन्य पराक्रमासमोर पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले. त्यामुळे पाकिस्तानने अमेरिकेत यावरून रडगाणे सुरु केले आहे. भारताने सर्व शक्तीनिशी पाकिस्तानवर हल्ला केला, आमच्या आधुनिक तंत्रज्ञानाची शस्त्रास्त्रे नाहीत, असा कबूलनामा देत अमेरिकेने आम्हाला आधुनिक शस्त्रास्त्रे विकावी, अशी विनवणी केली आहे.

पाकिस्तान पीपुल्स पार्टीचे अध्यक्ष आणि माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो जरदारी यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळाचा भाग आहेत. सध्या ते अमेरिकेत अधिकारी आणि खासदारांशी बोलत आहेत. पाकिस्तानने सुद्धा भारताची नक्कल करताना बिलावल भुट्टोच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ परदेश दौऱ्यावर पाठवले आहे. या 13 सदस्यीय प्रतिनिधिमंडळाने वॉशिंग्टनमध्ये सार्वजनिकरित्या अत्याधुनिक अमेरिकी शस्त्रांची मागणी केली आहे. पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री मुसादिक मलिक यांनी अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टिम आणि फायटर विमानांची मागणी केली आहे. आम्ही तुमच्याकडून ही शस्त्र खरेदी करु असे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानातील शहबाज आणि मुनीर सरकार आपली सरशी झाल्याची दवंडी पिटत आहेत. पण हा कबूलनामा पाकिस्तानची पोल-खोल करण्यासाठी पुरेसा आहे. (Operation Sindoor)

(हेही वाचा ‘२० मिनिटांत पाकिस्तानला चारली धूळ’; ‘Operation Sindoor’च्या यशानंतर एनडीएतील मित्रपक्षाकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक)

भारत 80 विमानांसोबत आला होता. त्यात 400 मिसाइल्स होती. काही मिसाइल अणवस्त्र वाहून नेण्यास सक्षम होती. तुम्ही पाहिले असेल, आमच्यासोबत काय झाले?. आमच्याकडे एअर डिफेन्स सिस्टिम नसती, तर आम्ही ढिगाऱ्याखाली दबलो गेलो असतो. भारताने जी टेक्नोलॉजी वापरली ती खूप Advance आहे. म्हणून आम्ही तुम्हाला म्हणतोय की, टेक्नोलॉजी आम्हाला द्या, आम्ही विकत घेऊ, असे पाकिस्तानी मंत्री मलिक सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत बोलताना दिसत आहेत. (Operation Sindoor)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.