Pakistani Spy : 3 वेळा पाकिस्तानात जाणाऱ्या पंजाबमधील आणखी एक युट्यूबरला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक ; ज्योती-दानिशशीही संबंध

Pakistani Spy : 3 वेळा पाकिस्तानात जाणाऱ्या पंजाबमधील आणखी एक युट्यूबर हेरगिरीच्या आरोपाखाली अटक ; ज्योती-दानिशशीही संबंध

73
Pakistani Spy : 3 वेळा पाकिस्तानात जाणाऱ्या पंजाबमधील आणखी एक युट्यूबरला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक ; ज्योती-दानिशशीही संबंध
Pakistani Spy : 3 वेळा पाकिस्तानात जाणाऱ्या पंजाबमधील आणखी एक युट्यूबरला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक ; ज्योती-दानिशशीही संबंध

पाकिस्तानासाठी हेरगिरी (Pakistani Spy) केल्याच्या आरोपाखाली ज्योती मल्होत्रा या युट्यूबरला अटक करण्यात आल्यानंतर आता आणखी एका युट्यूबरला अटक करण्यात आली आहे. जान महल या नावाने युट्यूब चॅनेल चालवारा जसबीर सिंग याच्यावरही हेरगिरीचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याच्या युट्यूबचे जवळपास ११ लाख सबस्क्रायबर्स आहेत. तो ३ वेळा पाकिस्तानला गेला आहे. (Pakistani Spy)

हेही वाचा-South Korea President Election : दक्षिण कोरियाच्या अध्यक्षीय निवडणुकीत ली जे-म्युंग विजयी ! मार्शल लॉ लागू करणाऱ्या येओल पक्षाला धक्का

पोलिस तपासात असे दिसून आले आहे की तो आयएसआय एजंट हसन अली उर्फ ​​जट्ट रंधावाच्या संपर्कात होता. तो हरियाणामधून अटक करण्यात आलेली युट्यूबर ज्योती मल्होत्रा ​​आणि पाकिस्तानी उच्चायुक्तालयातून काढून टाकण्यात आलेला अधिकारी एहसान-उर-रहीम उर्फ ​​दानिश यांच्या संपर्कात होता. (Pakistani Spy)

हेही वाचा- अंतराळवीर Shubanshu Shukla 10 जूनला करणार अंतराळ मोहिमेसाठी उड्डाण

मोहाली येथील स्टेट स्पेशल ऑपरेशन्स सेल (एसएसओसी) ने जसबीर सिंग विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. डीजीपी गौरव यादव म्हणाले की, जसबीर सिंगने दानिशच्या निमंत्रणावरून दिल्लीत आयोजित पाकिस्तान राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात भाग घेतला होता. येथे त्याने पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी आणि ब्लॉगर्सना भेट दिली. त्यांनी २०२०, २०२१ आणि २०२४ या वर्षात पाकिस्तानला भेट दिली आहे. (Pakistani Spy)

हेही वाचा- FBI : चीन अमेरिकेत पसरवतेय कृषी दहशतवाद ! धोकादायक बुरशीसह दोन चिनी नागरिकांना अटक

पोलिसांचे म्हणणे आहे की तपासादरम्यान त्याच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये अनेक पाकिस्तानी नंबर सापडले. त्याने त्याच्या फोनमधील डेटा देखील डिलीट केला आहे. त्याचा फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. ज्योतीला अटक केल्यानंतर पोलिसांना जसबीर सिंगवर संशय आला. (Pakistani Spy)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.