पहलगाम हल्ल्यानंतर पाकने भारतविरोधी कारवाया करणे आणि हिंदुद्वेषी वक्तव्ये करणे कमी केलेले नाही. नुकतेच पाकिस्तानी राजकारणी पलवाशा यांनीही बाबरी मशिदीचा (Babri Masjid) उल्लेख करून भारताचा चिथवले आहे. (Pahalgam Terror Attack)
पाकिस्तानी सिनेटर पलवाशा मोहम्मद झई खान (Palwasha Mohammad Zai Khan) यांनी घोषित केले की, “अयोध्येतील नवीन बाबरी मशिदीची पहिली वीट पाकिस्तानी लष्कराचे सैनिक ठेवतील आणि पहिली अजान स्वतः लष्करप्रमुख असीम मुनीर देतील, अशी वेळ दूर नाही.”
(हेही वाचा – ICSE 10th Exam Results : धारावीतील युवश्री सर्वाननने मिळवले ९३.०२ टक्के गुण)
अशा विधानांमुळे इस्लामाबाद भारताला युद्धासाठी चिथावणी देत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेल्या तणावाच्या वेळी पाकिस्तानच्या वरिष्ठ सभागृहात पलवाशा आणि इतर सिनेटरच्या टीकेमुळे आधीच अस्थिर परिस्थिती असलेल्या भारत-पाकिस्तान संबंधांत (India-Pakistan relations) पाकिस्तान तेल ओतण्याचा प्रयत्न करत आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सरकारने लष्करी कारवाई करावी, अशी मागणी भारतातून वाढत असताना, पलवाशा यांनी टिप्पणी केली की, भारताने “सिनेमॅटिक कल्पना आणि युद्धभूमीतील वास्तव यात खूप फरक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.”
प्रत्यक्षात पाकिस्तानची जर्जर झालेली स्थिती आणि भारत युद्ध करू शकतो, या शक्यतेनेच तेथील सेनादलांत सुरु झालेले राजीनामा सत्र हे पाकिस्तानला आरसा दाखवण्यासाठी पुरेसे आहे. त्यामुळे पाकच्या नेत्यांनी अशी बेताल वक्तव्ये करून भारताला युद्धासाठी चिथावणी देऊ नये, असे म्हटले जात आहे. (Babri Masjid)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community