India-Pakistan War : पाकमध्ये ‘डर का माहौल’ ! पीओकेमध्ये पाकिस्तानी सैन्याने बनवले बंकर, वॉर सायरन आणि लोकांना घरे खाली करण्याचे आदेश

India-Pakistan War : पाकमध्ये 'डर का माहौल' ! पीओकेमध्ये पाकिस्तानी सैन्याने बनवले बंकर, वॉर सायरन आणि लोकांना घरे खाली करण्याचे आदेश

60
India-Pakistan War : पाकमध्ये 'डर का माहौल' ! पीओकेमध्ये पाकिस्तानी सैन्याने बनवले बंकर, वॉर सायरन आणि लोकांना घरे खाली करण्याचे आदेश
India-Pakistan War : पाकमध्ये 'डर का माहौल' ! पीओकेमध्ये पाकिस्तानी सैन्याने बनवले बंकर, वॉर सायरन आणि लोकांना घरे खाली करण्याचे आदेश

पहलगाम हल्ल्यानंतर (India-Pakistan War) भारताने दिलेल्या इशाऱ्यानंतर आणि केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये वॉर मोड आला आहे. भारतीय सैन्याच्या संभाव्य कारवाईच्या भीतीमुळे पाकिस्तानने पीओके मध्ये बंकर खोदकाम सुरु केले आहे. सर्वसामान्य नागरिकांना घरे खाली करण्यास सांगून तिथे सैन्य चौकी बनवली जात आहे. युवकांना हत्यारांचे ट्रेंनिग देणे सुरू झाले आहे. खैबर पख्तूनख्वासारख्या संवेदनशील भागात वॉर सायरनही लावण्यात आलेत. (India-Pakistan War)

हेही वाचा-ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणून पुन्हा निवडून आल्याबद्दल Anthony Albanese यांचे पंतप्रधान मोदी यांनी केले अभिनंदन !

माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने POK मध्ये गुप्त बंकर तयार केलेत. सर्वसामान्य लोकांच्या घरांवर कब्जा करून तिथे सैन्य छावणी उभारली जात आहे. गिलगित-बालिस्टानच्या युवकांना शस्त्रे चालवण्याचं प्रशिक्षण दिले जात आहे. भारताने पाकविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यापासून पाकिस्तानात थयथयाट माजला आहे. पाकिस्तान सातत्याने भारताला पोकळ धमकी देत जगातील इतर देशांकडे सुरक्षेची भीक मागत आहे. पाकिस्तानी पंतप्रधान अलीकडेच तुर्कीच्या राजदूतांना भेटले. भारत युद्ध थोपवत असल्याचा खोटा आरोप पाकिस्तानने केला आहे. (India-Pakistan War)

हेही वाचा- NEET UG exam : देशभरात ‘नीट यूजी’ची परीक्षा ! गैरप्रकार कराल तर …

शनिवारी (दि.३) पाकिस्तानने ४५० किमी रेंजची अब्दाली बॅलेस्टिक मिसाईलची चाचणी केल्याची माहिती आहे. परंतु वास्तवमध्ये भारताच्या अग्नी मिसाईलसमोर पाकिस्तानची ही मिसाईल काहीच नाही, ना पाकची मिसाईल भारताला नुकसान पोहचवण्यात सक्षम आहे. अब्दालीच्या ४५० किमी रेंज असणाऱ्या मिसाईलच्या तुलनेने भारताची अग्नी मिसाईल ४ हजार किमी हून अधिक रेंजची आहे. सध्या पाकिस्तानी एअरफोर्सकडून ३ युद्ध सराव सुरू आहेत. ज्यात F16, J10, JF17 सारख्या लढाऊ विमानांचा समावेश आहे. पाकिस्तानने राजस्थाननजीक लॉन्गेवाला सेक्टरमध्ये आधुनिक रडार तैनात केली आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतात वॉर सायरन वाजवले जात आहेत. (India-Pakistan War)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.