भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात तब्बल ८६ तास चाललेले युद्ध शनिवारी संध्याकाळी ५ वाजता थांबले होते. दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीवर सहमती झाली होती, पण अवघ्या ४ तासांतच पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरात या सीमेलगतच्या भागात पाकिस्तानने (Pakistan) ड्रोन हल्ले आणि गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट करण्यात आले. याचदरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये सीमेपलीकडून पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसफचे एक जवान हुतात्मा, तर सात जण जखमी झाले.
(हेही वाचा Ceasefire : पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, बीएसएफचं चोख प्रत्युत्तर, मुख्यमंत्री अब्दुल्लाह यांचं ट्विट)
शनिवारी संध्याकाळी शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली. पण रात्र झाल्यानंतर पाकिस्तानकडून (Pakistan) त्याचे उल्लंघन करण्यात आले आणि कारवाया पुन्हा एकदा तीव्र झाल्या. शनिवारी रात्री पाकिस्तानने अनेक भागात युद्धबंदीचे उल्लंघन केले आणि जोरदार गोळीबार केला, तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात संशयित ड्रोनचा स्फोट झाला. एक बीएसएफ जवान हुतात्मा झाला आणि सात जण जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. ही घटना आरएसपुरा सेक्टरमध्ये घडली, असे त्यांनी सांगितले. सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, उपनिरीक्षक मोहम्मद इम्तियाज यांनी वीरमरण आले.मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने (Pakistan) अखनूर, राजौरी आणि आरएस पुरा आंतरराष्ट्रीय सीमेवर तोफखाना डागला आहे. त्याचवेळी बारामुल्लामध्ये ड्रोन हल्ला झाला आहे. जम्मूच्या पालनवाला सेक्टरमध्येही पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
Join Our WhatsApp Community