India Pakistan War : पाकिस्तानचे ‘गिरे तो भी टांग उपर’; सरकारी वृत्तवाहिनी म्हणते, आमच्यामुळे दिल्ली, राजस्थानमध्ये अंदाधुंदी

77

ऑपरेशन सिंदूरपासून (Operation Sindoor) ते युद्धबंदीपर्यंत, पाकिस्तान सतत खोट्या बातम्या पसरवत आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांसह सोशल मीडिया वापरकर्तेही भारताविरुद्ध खोट्या बातम्या पसरवत आहेत. भारतीय सेना सातत्याने हे खोटे उघडे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. (India Pakistan War)

(हेही वाचा – India Pakistan War : …तर पाकिस्तानला माफी नाही; पंतप्रधान मोदींनी अमेरिकेला बजावले)

पाकिस्तानच्या सरकारी वृत्तवाहिनी पीटीव्हीने वृत्त दिले की, पाकिस्तानने भारताची हवाई संरक्षण प्रणाली (Air defense system) एस – ४०० नष्ट केली. यानंतर, अनेक पाकिस्तानी वापरकर्त्यांनी ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली. एका वापरकर्त्याने पाकिस्तानच्या JF-17 लढाऊ विमानाचा (JF-17 fighter jet) व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, पाकिस्तानी हवाई दलाने हायपरसोनिक क्षेपणास्त्राने भारतीय S-400 नष्ट केले. सरकारी पीटीव्ही न्यूजनुसार, पाकिस्तानी हवाई दलाने आदमपूरमध्ये तैनात असलेल्या भारताच्या १.५ अब्ज डॉलर्सच्या एस-४०० हवाई संरक्षण प्रणालीला नष्ट करण्यासाठी या क्षेपणास्त्रांचा वापर केला.

त्यानंतर आता पाकड्यांनी पसरवलेल्या खोट्या नॅरेटिव्हची जंत्रीच पुढे आली आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिनी पीटीव्हीने म्हटले आहे की, पाकिस्तानी सेनेने भारताला गुडघे टेकण्यासाठी मजबूर केले, पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यात बीजेपीची ऑफिशियल वेबसाईट, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, महानगर टेलिकॉम, क्राइम रिसर्च कंपनी, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यांच्या वेबसाईट हॅक करण्यात आल्या आहेत. उधमपूर हवाई तळ (Udhampur Air Base) आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे, असे म्हणत त्याचे खोटे व्हिडिओही ही वृत्तवाहिनी दाखवत आहे. यासह पाकिस्तानच्या हल्ल्यांमुळे दिल्ली, राजस्थानमध्ये अंदाधुंदी माजली आहे, असेही वाहिनीने म्हटले आहे.

प्रत्यक्षात भारतीय सेनादलांनी पत्रकार परिषद घेऊन भारतावर पाकने अशा प्रकारचे कोणतेही हल्ले केलेले नाहीत, हे स्पष्ट केले आहे. असे असूनही आणि स्वतः युद्धात सपाटून मार खाऊनही पाकिस्तानची सरकारी वृत्तवाहिनी धादांत खोटे वार्तांकन करत आहे. यामुळे जागतिक स्तरावर पाक स्वतःचे हसे करून घेत आहे, असेच चित्र निर्माण झाले आहे. (India Pakistan War)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.