Pakistan च्या गुप्तचर संघटनेची कुरघोडी, भारताच्या व्हॉटस्अप नंबरवरून मिळवतात संवेदनशील माहिती

Pakistan : India-Pakistan तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांत मोठ्या हालचाली होताना दिसून येत आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधातील ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान भारताविरोधी कारवायांसाठी नवनवे मार्ग चाचपडताना दिसते आहे.

56

(हेही वाचा IPL 2025 : युद्धविरामाच्या बातमीनंतर गुजरात टायटन्सचा अहमदाबादेत सराव सुरू )

दरम्यान, “ऑपरेशन सिंदूर”अंतर्गत होणाऱ्या हालचाली पाहता भारताच्या कारवाईची माहिती मिळविण्याकरिता पाकिस्तानकडून प्रयत्न होत असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूर संदर्भातील गुप्त माहिती मिळविण्याकरिता भारतीय पत्रकार व नागरिकांना पाकिस्तानकडून भारतीय व्हॉट्सअॅप नंबर: 𝟕𝟑𝟒𝟎𝟗𝟐𝟏𝟕𝟎𝟐 चा वापर होत आहेत.

महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा(पीआयओ) भारतीय संरक्षण अधिकारी असल्याचे भासवून (𝟕𝟑𝟒𝟎𝟗𝟐𝟏𝟕𝟎𝟐) भारतीय व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करत आहेत. दरम्यान, भारतीय हवाई दलाने याआधीच स्पष्ट केल्यानुसार, ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरूच आहे. दहशतवाद्यांना उद्ध्वस्त करण्याचा हेतूही भारतीय सैन्यदलांनी बोलून दाखविला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.