Operation Sindoor : पाकिस्तानला सातत्याने जशास तसे उत्तर देणे गरजेचे; लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनोद खंदारेंची स्पष्टोक्ती

Operation Sindoor हे केवळ २ सैन्यांमधील युद्ध नाही. आर्थिक शक्तींमधले युद्ध आहे, असे खंदारे यांनी म्हटले आहे.

63

ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) संरक्षण मंत्रालयाचे प्रमुख सल्लागार लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनोद खंदारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका वृत्तावाहिनीवर बोलतांना ते म्हणाले, हे नव्या युगातील युद्धतंत्र आहे. आपण काही वेगळे काही केले आहे, असे नाही. आपण सातत्याने हे केले पाहिजे. पाकिस्तानला (Pakistan) जशास तसे उत्तर दिले पाहिजे. हे २ सैन्यांमधील युद्ध नाही. आर्थिक शक्तींमधले युद्ध आहे. संपूर्ण देशाने हे युद्ध लढले आहे. केवळ सेनादलांच्या हल्ल्यांनाच नाही, तर आपण नॅरेटिव्हलाही सातत्याने प्रत्युत्तर दिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया संरक्षण मंत्रालयाचे प्रमुख सल्लागार लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनोद खंदारे (Lt. Gen. (Retd) Vinod Khandare) यांनी दिली आहे.

(हेही वाचा – पावसाळ्यात Konkan Railway ची यंत्रणा २४ तास सज्ज ; तीन नियंत्रण कक्ष, सहा ठिकाणी वैद्यकीय पथक कार्यरत)

नुकतेच खंदारे यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमातही त्यांचे विचार व्यक्त केले. ते म्हणाले, बालाकोट हल्ल्यादरम्यान (Balakot Attack) विंग कमांडर अभिनंदन यांना ओलीस ठेवण्यात आले होते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान आमच्याकडे सहा बॅक-अप प्लॅन होते. आम्हाला अभिनंदन सारखी दुसरी घटना घडू द्यायची नव्हती. ऑपरेशन सिंदूर रद्द करण्यात आलेले नाही आणि सिंधू पाणी करारही (Indus Water Treaty) पूर्ववत करण्यात आलेला नाही. याचा अर्थ पाकिस्तानला आपण पुढे काय करू शकतो याची काहीच कल्पना नाही. आपण “सरप्राईज इलेमेंट’ कायम ठेवला आहे, असे ते म्हणाले.

त्या भागात सीआरपीएफ तैनातीसाठी ३ राष्ट्रीय रायफल्सना बाहेर काढले जात होते, दहशतवाद्यांनी त्या वेळी पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) हल्ला केला. काश्मीरमध्ये २.५ कोटी पर्यटक येत असल्याने, सामान्य परिस्थिती पुन्हा सुरू झाल्याचे दिसून आली. यामुळे दहशतवाद्यांनी हल्ला केला. बहुतेक सुरक्षा दल लोकवस्ती असलेल्या भागात तैनात असल्याने दहशतवाद्यांनी गोंधळ निर्माण करण्यासाठी पहलगामसारख्या दुर्गम भागाची निवड केली, असे लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनोद खंदारे (Vinod Khandare) म्हणाले. (Operation Sindoor)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.