World Bank : सिंधू पाणी करारावरून पाकिस्तानला जागतिक बँकेकडून मोठा धक्का बसला आहे. जागतिक बँकेने म्हटले आहे की, आपण या प्रकरणात भारताला रोखू शकत नाही. जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा (World Bank President Ajay Banga) म्हणाले की, आमची यात कोणतीही भूमिका नाही. आमची भूमिका फक्त एका सुविधा देणाऱ्याची आहे म्हणून आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही. खरं तर, २२ एप्रिल रोजी पहलगाम (Pahalgam terrorist attack) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या एका दिवसानंतर, भारताने दशके जुना सिंधू पाणी करार स्थगित केला होता. या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांना गोळ्या घालून हत्या करण्यात आली. (World Bank)
(हेही वाचा – भारतीय चेक पोस्ट उडवले, फियादीन हल्ला, जालंधरमध्ये ड्रोन हल्ला; सगळे काही खोटे; पीआयबीने FACT Check द्वारे केला पर्दाफाश)
तसेच १९६० मध्ये दोन्ही देशांनी सिंधू, झेलम आणि चिनाब नदीच्या पाण्याच्या वाटपासाठी हा करार केला होता. हा करार जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झाला होता. दरम्यान सिंधू पाणी करार स्थगित झाल्यानंतर, जागतिक बँक हस्तक्षेप करू शकते अशा बातम्या माध्यमांमध्ये येऊ लागल्या. परंतु जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, जागतिक बँकेची भूमिका केवळ एका सुविधा देणाऱ्याची आहे. हस्तक्षेपाची किंवा चर्चा करण्याची भूमिका नाही. त्यामुळे पाकड्या मोठ्या संकटात सापडला आहे. सिंधू पाणी करार (Indus Water Treaty) हा पाकिस्तानची जीवनरेखा मानली जाते. तसेच पाकिस्तानची २१ कोटींहून अधिक लोकसंख्या पाण्यासाठी सिंधू आणि तिच्या चार उपनद्यांवर अवलंबून आहे. याशिवाय, ९०% जमिनीसाठी सिंधू नदीतून सिंचनाचे पाणी येते.
(हेही वाचा – India-Pakistan War : Air Strike नेहमी रात्रीच्या वेळेस का होतात?, जाणून घ्या काय आहे यामागचं कारण)
सिंधू नदी प्रणालीमध्ये मुख्य सिंधू नदी आणि तिच्या उपनद्या समाविष्ट आहेत. यामध्ये रावी, बियास, सतलज, झेलम आणि चिनाब या तिच्या उपनद्या आहेत. काबूल नदी भारतीय हद्दीतून वाहत नाही. रावी, बियास आणि सतलज यांना पूर्वेकडील नद्या म्हणतात. तर सिंधू, झेलम आणि चिनाब यांना पश्चिमेकडील नद्या म्हणतात. या नदीचे पाणी भारत आणि पाकिस्तान दोघांसाठीही महत्त्वाचे असून, या नद्यांवर दोन्ही देशातील शेतकरी मोठ्या प्रमाणांवर अवलंबून आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community