Pakistan Fake Report : भारत-रशिया मैत्रीत फूट पाडण्याचा प्रयत्न फेल; पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड

Pakistan Fake Report : पाकिस्तानचा खोटारडे(Pakistan Fake Report)पणा पुन्हा एकदा उघड झाला असून भारत-रशिया मैत्रीत फूट पाडण्याचा प्रयत्न फेल गेला आहे. रशियाने पाकिस्तानसोबत आर्थिक संबंध वाढवित असल्याचा दावा करणारे खोटे वृत्त(Pakistan Fake Report) फेटाळून लावले आहे. विशेषतः कराचीमध्ये दोन्ही देशांत स्टील मिल्स स्थापन करून भारत आणि रशियातील आर्थिक संबंध बिघडविण्याचा केविलवाणा प्रयत्न खुद्द रशियानेच हाणून पाडला आहे.(Pakistan Fake Report)

80

Pakistan Fake Report : पाकिस्तानचा खोटारडे(Pakistan Fake Report)पणा पुन्हा एकदा उघड झाला असून भारत-रशिया मैत्रीत फूट पाडण्याचा प्रयत्न फेल गेला आहे. रशियाने पाकिस्तानसोबत आर्थिक संबंध वाढवित असल्याचा दावा करणारे खोटे वृत्त(Pakistan Fake Report) फेटाळून लावले आहे. विशेषतः कराचीमध्ये दोन्ही देशांत स्टील मिल्स स्थापन करून भारत आणि रशियातील आर्थिक संबंध बिघडविण्याचा केविलवाणा प्रयत्न खुद्द रशियानेच हाणून पाडला आहे.(Pakistan Fake Report)

(हेही वाचा India Defence Export : रिलायन्स इन्फ्राची २ वर्षांत ३,००० कोटींची संरक्षण सामुग्री निर्यातीची तयारी )

दरम्यान, एका रशियन अधिकाऱ्याने पाकिस्तानसोबतच्या स्टील मिल्स कराराच्या वृत्ताचे(Pakistan Fake Report) खंडन केले आहे. तर इस्लामाबाद आणि मॉस्को औद्योगिक सहकार्याला चालना देण्यासाठी नवीन स्टील मिल्स संयुक्तपणे विकसित करून शीतयुध्द काळातील सहकार्य पुनरुज्जीवित करण्याचा केविलवाणा प्रयत्न पाकिस्तान करत आहे. अशा प्रकारच्या बातम्याच पाकिस्तानी माध्यमांमध्ये चालविण्यात येत होत्या.

पाकिस्तानचा दावा काय होता?

पाकिस्तानसोबत रशियाने २.६ अब्ज डॉलर्सचा करार केल्याच्या वृत्तां(Pakistan Fake Report)ना रशियाने स्पष्टपणे फेटाळून लावले आहे. तसेच, ही माहिती पूर्णतः खोटी असून भारत-रशिया मैत्रीत फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया आता रशियाकडून दिली जात आहे. रशियाच्या स्पष्टीकरणानंतर आता पाकिस्तानी माध्यमांच्या खोटा चेहरा जगासमोर आला आहे.

मागील काही दिवसांपासून काही पकिस्तानी माध्यमांकडून पाकिस्तान आणि रशिया उभय देशांमध्ये २.६ अब्ज डॉलर्सचा कराराच्या वृत्ता(Pakistan Fake Report)ला प्रसिद्धी दिली होती. या कराराच्या माध्यमातून रशिया कराची बंदराजवळ असणार्‍या १९७० सालच्या सोव्हिएत काळातील स्टील प्लांटमध्ये गुंतवणूक करणार असल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र, असे कोणताही करार न झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

(हेही वाचा Attack On Israel Supporters : अमेरिकेत इस्रायल समर्थकांवर हल्ला, हल्लेखोरांनी दिल्या ‘फ्री पॅलेस्टाईन’च्या घोषणा )

भारत आणि रशिया यांचे संबंध हे दीर्घकालीन मजबूत राहिलेले असताना अचानक रशिया पाकिस्तानशी जवळीक साधण्याच्या बातम्यांमुळे भारतासमोरचा पेच वाढण्याची शक्यता होती. मात्र, रशियाच्या स्पष्टीकरणानंतर आता चित्र स्पष्ट झाले असून पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघडा पडला आहे.

भारताला ‘Su-57E’ देण्याची रशियाची तयारी

रशियाने भारताला पुन्हा एकदा पाचव्या पिढीचे ’Su-57E’ खरेदी करण्याची विनंती केली आहे. यावेळी रशियाने दिलेल्या प्रस्तावात भारतीय तंत्रज्ञानाशी अनुकूल लढाऊ विमाने तयार करण्याची तयारीही दर्शविली आहे. या लढाऊ विमानांमध्ये एईएसए रडार, भारतीय हवाईदलाला हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्यासाठी आवश्यक स्वदेशी तंत्रज्ञान, भारतीय तंत्रज्ञानाशी सुसंगत करण्याचाही प्रस्तावात समावेश करण्यात आला आहे. तसेच, भारताच्या आवश्यकतेनुसार त्यात बदल करण्याच्या अधिकारासहित, सोर्स कोड आणि तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यासही रशिया तयार असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.(Pakistan Fake Report)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.