Pakistan : भारताच्या लष्करी कारवाईआधीच पाकड्यांना दणका, नेमकं काय घडलं?

पाकिस्तान(Pakistan)वर आधीच युध्दाचं सावट असताना आता नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. युध्दापूर्वीच पाकिस्तान(Pakistan)ला ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे.

94

पाकिस्तान(Pakistan)वर आधीच युध्दाचं सावट असताना आता नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. युध्दापूर्वीच पाकिस्तान(Pakistan)ला ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे. युध्दाच्या सावटाने तणावपूर्ण शांतता असताना निसर्गाने पाकिस्तानला दणका दिला आहे. पाकिस्तानी वेळेनुसार ०३.३० वाजता भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे.

(हेही वाचा Pahalgam Terror Attack : पाकिस्तानविरोधात रणनीती तयार?, पंतप्रधान मोदींची संरक्षण सचिवांसोबत खलबतं )

दरम्यान, ४.२ तीव्रतेचा भूकंप हा सौम्य श्रेणीत मोडतो. ज्यामुळे सामान्यतः मोठ्या प्रमाणात नुकसान होत नाही. परंतु, या भूकंपामुळे पाकिस्तानी नागरिक काही काळ भीतीच्या वातावरणाखाली होते. मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपामध्ये कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. एकंदरीत, भारताकडून घेण्यात येत असलेल्या कठोर निर्णयांमुळे पाकिस्तान(Pakistan) जेरीस आला असताना आणखी एक नवा धक्का यानिमित्ताने बसला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्ताना(Pakistan)विरोधात भारतीय लष्कराने कंबर कसली असून याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तान भूकंपाने हादरलं असून पाकिस्तानात भूकंपाचे धक्के बसले आहेत. ४.२ रिश्टर स्केलचा भूकंप पाकिस्तानला बसला असून या भूकंपामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या भूकंपामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.(Pakistan)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.