Pakistan Earthquake : भूकंप ठरला कैद्यांसाठी फायद्याचा; कारागृहाच्या भिंती तोडून कैदी फरार

Pakistan Earthquake : पाकिस्तानातील कराची शहरात आलेला भूकंप(Pakistan Earthquake) कैद्यांच्या पथ्यावर पडल्याचे समोर आले आहे. भूकंपामुळे मलीर कारागृहातील भिंतीना भेगा पडल्यानंतर या भिंती तोडून कैदी फरार झाले. यात तब्बल २१६ कैदी पळून गेल्याचे उघडकीस आले आहे.

65

Pakistan Earthquake : पाकिस्तानातील कराची शहरात आलेला भूकंप(Pakistan Earthquake) कैद्यांच्या पथ्यावर पडल्याचे समोर आले आहे. भूकंपामुळे मलीर कारागृहातील भिंतीना भेगा पडल्यानंतर या भिंती तोडून कैदी फरार झाले. यात तब्बल २१६ कैदी पळून गेल्याचे उघडकीस आले आहे. परंतु, त्यातील ८० कैद्यांना पुन्हा अटकदेखील करण्यात आली. विशेष म्हणजे घटनेदरम्यान झालेल्या गोळीबारामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच पाच कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. कराचीमध्ये २४ तासांत दहापेक्षा जास्त भूंकपाचे झटके जाणवले. रात्री ११.१६ मिनिटांनी लांधी, शेरपाओ आणि कायदाबादसारख्या भागात २.४ रिश्टेल स्केलचा भूकंप(Pakistan Earthquake) झाला.

पाकिस्तानी सरकारमधील मंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

दरम्यान, सिंधचे कारागृहमंत्री अली हसन झरदारी यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. कारागृह महानिरीक्षकांकडून अहवाल मागविला असून या भागाची नाकेबंदी करण्याचेही आदेशही मंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. सदर प्रकरणात अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा तर नाही ना? यासंदर्भात चौकशी करण्यात येत आहे.

गोळीबारात एक जण जखमी

कराचीचे डीआयजी मोहम्मद हसन सेहतो यांनी म्हटले की, भूकंपामुळे अनेक कैदी आपल्या बॅरकमधून बाहेर आले. कारागृहाचा गेट तोडून कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. यावेळी कैद्यांनी कारागृहातील कर्मचाऱ्यांची शस्त्रही हिसकवून घेतली. त्यानंतर पोलीस आणि कैदी यांच्यात गोळीबार झाला. या गोळीबारावेळी कैदी कारागृहातून फरार झाले. यात एक कैदी जखमी झाला आहे.(Pakistan Earthquake)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.