Khwaja Asif : भारताचा ड्रोन हल्ला रोखण्यात आलेले अपयश लपवताना पाक संरक्षण मंत्र्यांचा हास्यास्पद खुलासा

69

भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर मिरच्या लागलेल्या पाकिस्तानने भारतावर आधी सीमा भागात बेछूट गोळीबार केला, नंतर तोफ गोळे डागले, आता क्षेपणास्त्रे डागली. हा सगळा मारा भारतीय लष्कराने यशस्वीपणे परतवून लावला. नंतर मात्र भारतीय लष्कराने पाकिस्तानवर ड्रोन हल्ले केले. ज्यामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले.परंतु पाकिस्तान सरकारकडून लाहोर, कराची आणि रावळपिंडीसह अनेक ठिकाणी भारताने केलेला २५ ड्रोन हल्ला आम्ही हाणून पाडल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र एका दिवसानंतर, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी आता यू-टर्न घेतला आहे. पाकच्या संसदेत या हल्ल्याविषयी माहिती देताना पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ (Khwaja Asif) यांनी जो खुलासा केला आहे, तो ऐकून पाकड्यांची हसावे कि रडावे अशी अवस्था झाली आहे.

काय म्हणाले ख्वाजा असिफ? 

ख्वाजा असिफ (Khwaja Asif) म्हणाले की, भारताने पाकिस्तानवर जो ड्रोन हल्ला केला, तो आम्ही जाणीवपूर्वक परतवून लावला नाही. ते ड्रोन पाडले नाहीत. कारण हा ड्रोन हल्ला त्यांनी पाकिस्तानातील गुप्त, महत्वाची ठिकाणी कोणती आहेत, ती शोधण्यासाठी केला होता.

(हेही वाचा पाकिस्तानच्या लष्कर अधिकाऱ्यांनी मागितला लष्करप्रमुख Asim Munir यांचा राजीनामा; पाकचे लष्कर बुडाले सत्ता संघर्षात)

याआधीही ख्वाजा असिफ यांनी केलेला हास्यास्पद खुलासा

भारताने जेव्हा ऑपरेशन सिंदूर केले, त्यावेळी पाकिस्तानने भारताचे ५ राफेल विमाने पडल्याचा दावा केला होता. त्यावर सी एन एन या वृत्त वाहिनीने ख्वाजा असिफ यांची मुलाखत घेताना त्यांना थेट विचारले होते की, तुम्ही कोणत्या आधारे दावा करता की तुम्ही भारताचे राफेल विमाने पाडली, तुमच्याकडे कोणता पुरावा आहे? त्यावर ख्वाजा असिफ (Khwaja Asif) म्हणाले, सोशल मीडियामध्ये व्हिडियो फिरत आहेत, त्यावरून हे स्पष्ट होते. त्यावर अँकरने विचारले, तुमच्याकडे पुरावा काय आहे? , तेव्हा ख्वाजा असिफ (Khwaja Asif) म्हणाले, आम्ही पडलेल्या राफेलचे तुकडे हे भारताच्या हद्दीत पडले आहेत. तेव्हा अँकरने ख्वाजा असिफ यांनी, तुम्ही संरक्षण मंत्री आहात, अशा शब्दांत जाणीव करून दिली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.