Pakistan ची ‘गिरे तो भी टांग उपर’ वृत्ती १९७१ नंतर अजूनही कायम

१९७१च्या युद्धात भारताने पाकिस्तानचा (Pakistan) दारुण पराभव केला होता. ९० हजार पाकिस्तानी सैन्यांनी भारतीय सैन्यांच्या पायावर डोके ठेवून शरणागती स्वीकारली होती. तरीही पाकिस्तानच्या 'द डॉन' या वृत्तपत्रात 'वॉर टील व्हीक्ट्री' या मथळ्याखाली ठळक वृत्त प्रसिद्ध झाले होते.

78

भारताने सिंदूर ऑपरेशनमध्ये पाकिस्तानला (Pakistan) जबरदस्त चोपले, त्यानंतर पाकिस्तानने भारतावर बेछूट हल्ले केले, नागरी वस्त्यांवर हल्ले केले. भारताने प्रत्युत्तरात पुन्हा एकदा पाकिस्तानला (Pakistan) धुतले, सलग तीन दिवस पाकिस्तान भारतीय सैन्याकडून मार खात आहे. त्यामुळे १९७१ची आठवण पुन्हा जागी झाली आहे. त्यावेळी पाकिस्तानचा दारुण पराभव झाला, तरीही पाकिस्तानच्या ‘द डॉन’ वृत्तपत्रात पाकिस्तानने पराभव मान्य न करता जिहाद सुरूच ठेवण्याची घोषणा केली. आताही पाकिस्तान दररोज भारताकडून मार खात असतानाही पुन्हा पुन्हा आव्हानाच्या भाषा करत आहे.

पाकिस्तानी सैन्याची विचारधारा देशाचे संरक्षण नसून ‘जिहाद’

१९७१च्या युद्धात भारताने पाकिस्तानचा (Pakistan) दारुण पराभव केला होता. ९० हजार पाकिस्तानी सैन्यांनी भारतीय सैन्यांच्या पायावर डोके ठेवून शरणागती स्वीकारली होती. तरीही पाकिस्तानच्या ‘द डॉन’ या वृत्तपत्रात ‘वॉर टील व्हीक्ट्री’ या मथळ्याखाली ठळक वृत्त प्रसिद्ध झाले होते. याचा अर्थ पाकिस्तानने (Pakistan) तेव्हाही पराभव मान्य केला नव्हता. याच पानावर ‘चीनकडून पाकिस्तानला पाठिंबा देण्याचे आश्वासन’ अशा मथळ्याचे वृत्त दिले. यातून पाकिस्तानने स्वतःचा उद्देशही स्पष्ट केला होता, जो आजही कायम असून त्याच चीनच्या जोरावर पाकिस्तान उड्या मारत आहे. याच पानावर ‘जिहाद’ची घोषणा करण्यात आल्याची सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये पाकिस्तानने (Pakistan) संरक्षण व्यवस्थेसाठी जिहादकरता पैसे देण्याचे आव्हान नागरिकांना केले. या सगळ्या वृत्तांकनावरून १९७१ च्या युद्धानंतरही पाकिस्तानची ‘गिरे तो भी टांगे उपर’ अशी वृत्ती स्पष्टपणे दिसत आहे. पाकिस्तानी सैन्याची विचारधारा देशाचे संरक्षण नसून ‘जिहाद’ असल्याचे स्पष्ट होत आहे.

(हेही वाचा Pakistan : गरज पडली तर मदरशांतील विद्यार्थ्यांना सीमेवर पाठवू; पाकच्या संरक्षण मंत्र्यांचे धक्कादायक विधान)

आजही पाकिस्तानची विचारधारा बदलली नाही. पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे पर्यटकांना त्यांची धर्म विचारून ते हिंदू असल्याचे निश्चित झाल्यावर त्यांना ठार केले. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानचे नेते बिलावल भुट्टो यांची भाषाही जिहादीवृत्ती दर्शवत होती. आता तर पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांनी, वेळप्रसंगी आम्ही मदरसामधील विद्यार्थ्यांना सीमेवर पाठवू असे वक्तव्य केले. मागील तीन दिवस पाकिस्तान भारतीय सैन्याकडून मार खात असूनही पाकिस्तानची भाषा आव्हानांची आहे. या सर्व घटनाक्रमावरून हेच दिसते की पाकड्यांची १९७१ची वृत्ती अजूनही गेली नाही.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.