ऑपरेशन सिंदूरनंतर सैरभैर झालेल्या पाकिस्तानने सीमेवर बेछूट गोळीबार करणे, नागरी वस्त्यांवर तोफगोळे टाकणे, क्षेपणास्त्रे डागणे, असे प्रकार सुरु केले आहेत. त्यामुळे भारताच्या सैन्याने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. पाकिस्तानवर क्षेपणास्त्रांनी हल्ले करून पाकिस्तानचे मोठे नुकसान केले. त्यावेळी मात्र पाकिस्तानने दावा केला आहे की, आम्ही भारताचे राफेल विमान पाडल्याचा दावा केला. त्याचा व्हिडीओही प्रसारित झाला. मात्र हिंदुस्थान पोस्टने FACT Check द्वारे याची सत्यता पडताळली, त्यावेळी पाकड्यांचा हा दावा साफ खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
(हेही वाचा Pakistan ने नागरिकांचाच जीव लावला पणाला; नागरी हवाई सेवा सुरूच ठेवली)
पाकिस्तानने त्यांच्या लष्कराचे आणि नागरिकांचे अवसान राखण्यासाठी असे खोटे दावे करणे सुरू आहेत. त्यातला एक हा राफेल विमान पाडल्याचा दावा आहे. या व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी हिंदुस्थान पोस्टने भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या व्हिडिओमध्ये दाखवलेले विमान हे राफेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राफेल विमानाला एकच टेल फिन असते. या व्हिडिओमधील विमानाला दोन फिन्स आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये दिसणारे हेलिकॉप्टर हे रशियन बनावटीचे आहे. यातून हे स्पष्ट होते की, पाकिस्तान खोटे बोलत आहे. पाकिस्तान जो राफेल विमान पाडल्याचा दावा करत आहे, तो हिंदुस्थान पोस्टाच्या FACT Check नुसार सपशेल खोटा सिद्ध झाला आहे. भारताचे कुठलेच नुकसान करु न शकल्याने पाकिस्तान बिथरला आहे, हेच दिसून येत आहे.
Join Our WhatsApp Community