Pakistan Blast : पाकिस्तानात लष्कराच्या ताफ्यावर पुन्हा एकदा हल्ला करण्यात आला आहे. पाकिस्तानातील कराची-क्वेटा महामार्गावर लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्या ३२ सैनिक ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. कराची-क्वेटा महामार्गा(Pakistan Blast)वर एक विस्फोटकाने भरलेली गाडी उभी करण्यात आली होती. पाकिस्तानी लष्कराचा ताफा तिथून जाताचा गाडीचा स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ताफ्यात एकूण ८ वाहनांचा समावेश होता.यातील ३ वाहने स्फोटात लक्ष्यित झाली. दरम्यान, यातील एक वाहन सैनिकांच्या कुटुंबियांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा समावेशदेखील होता.(Pakistan Blast)
(हेही वाचा Manipur : सुरक्षा दलांनी मणिपूरमधून तीन माओवाद्यांना केली अटक; वाहन जप्त )
दरम्यान, पाकिस्तानात लष्कर आणि बलुच लिबरेशन आर्मी यांच्यातील संघर्ष अनेकदा समोर आलेला आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील अधिकारी अंतर्गत सुरक्षेतील अपयश लपविण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, संपूर्ण घटनेवर पांघरूण घालण्यासाठी अधिकाऱ्यांकडून यास स्कूल बसवरील हल्ल्यासारखं भासविले जात आहे. त्यामुळे आता अधिकारी त्यांच्या सुरक्षेतील त्रुटी लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे या हल्ल्याची जबाबदारी अद्यापही कुठल्याही दहशतवादी संंघटनेने घेतलेली नाही.
दुसऱ्यांदा पाकिस्तानात मोठा स्फोट
दि. २१ मे रोजी याच महामार्गावर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या आर्मी पब्लिक स्कूल बसवर दहशतवाद्यांनी(Pakistan Blast) हल्ला केला होता. या हल्ल्यात बस चालकासह पाच मुले ठार झाली. या घटनेमुळे पाकिस्तानच्या सामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळाले होते. महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तावर बऱ्याच काळापासून दहशतवादाला पोसण्याचा आरोप केला जात असतानाच आता अंतर्गत दहशतवादी हल्ल्यांत वाढत होत आहे. त्यामुळे आता पाकिस्तानी सुरक्षा संस्थांच्या कमकुवतपणा समोर आला आहे.(Pakistan Blast)
(हेही पाहा)
Join Our WhatsApp Community