पाकिस्तानचा लष्करप्रमुख असिम मुनीर Asim Munir याला गुरूवारी रात्री अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे.
गुरुवारी रात्री पाकिस्तानने भारताच्या काही ठिकाणांवर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. तो हाणून पाडल्यानंतर भारताने सडेतोड प्रत्युत्तर देत पाकिस्तानातील महत्त्वाच्या शहरांवर हल्ले चढवले. त्यानंतर पाकिस्तानमध्ये लष्कर आणि सरकारमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती आहे. त्यातूनच भारताविरोधात अणुबॉम्ब हल्ल्याची दर्पोक्ती करणाऱ्या लष्करप्रमुख असिम मुनीरला Asim Munir अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. समशाद मिर्झा हा पाकिस्तानचा नवा लष्करप्रमुख असेल असे समजते आहे.
भारताने पाकिस्तानातील कराचीवर 15 ठिकाणी ड्रोन हल्ले केले. तसेच एफ 16 विमान पाडले. त्याचा वैमानिक ही बंदी केला. त्यानंतर पाकच्या लष्करी अधिकाऱ्याने निमूटपणे आमचे विमान भारताने पडल्याची जाहीर कबुली दिली. दरम्यान भारताने आता भू दल, वायू दल आणि नौ दलालाही सज्ज राहण्याचे आदेश दिल्याने हे संपूर्ण युद्ध होण्याची शक्यता वाढली असताना पाकने Asim Munir ला अटक केल्याने मोठा ट्विस्ट आला आहे.
Join Our WhatsApp Community