Pakistan : पाकड्यांची खुमखुमी अजूनही जात नाही; पाकिस्तानकडून जम्मू, सांबा आणि पठाणकोट येथे हल्ला

जम्मू, सांबा आणि पठाणकोट येथेही ड्रोन दिसल्याची पुष्टी झाली आहे. सुरक्षा दलांनी या ड्रोन हालचालींवर तात्काळ कारवाई केली आणि त्यांना निष्क्रिय केले.

58

पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम हल्ला केल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदुरच्या माध्यमातून बदला घेतला. मात्र यातून खवळलेल्या पाकिस्तानने (Pakistan) विशेषतः पाकिस्तानचे पंतप्रधान शाहवाज शरीफ यांनी लष्करप्रमुख असीम मुनीरच्या दबावामुळे पाकिस्तानच्या लष्कराला भारतावर हल्ले करण्याचा आदेश दिला. त्यामुळे ८ मे रोजी पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले, ते सर्व परतवून टाकल्यानंतर भारताने जोरदार क्षेपणास्त्रांचा हल्ला केला. त्यानंतर काहीशी नरमाईची भूमिका घेणाऱ्या पाकिस्तानने (Pakistan) ९ मे रोजी रात्री पुन्हा हल्ला केला. यावेळी त्यांनी क्षेपणास्त्रांचा हल्ला केला.

पाकिस्तानकडून (Pakistan)आंतराराष्ट्रीय सीमा रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. शुक्रवारी पुन्हा जम्मूमध्ये ब्लॅकआउट करण्यात आले, तसेच शहरात सायरनचे आवाज ऐकायला मिळाले. रात्री ८.३० च्या सुमारास शहरात स्फोटांचे आवाज देखील ऐकायला मिळाले. अशी माहिती जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक्स वर पोस्ट करत दिली आहे. ओमर अब्दुल्ला हे सध्या जम्मूमध्ये आहेत.

पाकिस्तानकडून (Pakistan) लष्कराच्या जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथील लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याच्या दुसऱ्या दिवशी जम्मूमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचा प्रकार समोर आला आहे. पाकिस्तानकडून उरी सेक्टरमध्येदेखील नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरु केला आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. याशिवाय जम्मू, सांबा, पठाणकोट येथे देखील पाकिस्तानचे (Pakistan)  ड्रोन दिसल्याची माहिती समोर येत आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी ब्लॅकआऊट करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचा राफेल पाडल्याचा पाकड्यांचा दावा खोटा; ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या FACT Check मधून पर्दाफाश)

जम्मूमध्ये गुरुवारी रात्री देखील अनेक तास ब्लॅकआउट ठेवण्यात आला होता. मध्यरात्रीच्या आधी एक हल्ला परतवून लावण्यात आल्यानंतर शुक्रवारी पहाटे ३ वाजून ५० मिनिटांनी देखील पाकिस्तानकडून (Pakistan) हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हल्ल्याचा प्रयत्न झाल्याच्या दुसऱ्या दिवशी जम्मूमध्ये दिवसाचे कामकाज पूर्वीप्रमाणे सुरू झाल्याचे पाहायला मिळाले होते. शुक्रवारी व्यावसाय, बँका आणि सरकारी कार्यालये नेहमीप्रमाणे सुरू होती. मात्र रात्र होताच पाकड्यांनी पुन्हा हल्ले करून खुमखुमी दाखवली.

जम्मू, सांबा आणि पठाणकोट येथेही ड्रोन दिसल्याची पुष्टी झाली आहे. सुरक्षा दलांनी या ड्रोन हालचालींवर तात्काळ कारवाई केली आणि त्यांना निष्क्रिय केले. संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. भारतीय सुरक्षा दलांनी जम्मू आणि राजस्थानमधील पोखरणमध्ये संशयास्पद ड्रोन घुसखोरी यशस्वीरित्या उधळून लावली. हाय अलर्ट दरम्यान, ड्रोनला अडवण्यात आले आणि निष्क्रिय करण्यात आले, ज्यामुळे संभाव्य धोका टळला.

पंतप्रधान मोदींची माजी सैन्य अधिकाऱ्यांशी चर्चा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सशस्त्र दलातील माजी सैन्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी सध्याच्या परिस्थितीसंदर्भात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. या बैठकीला माजी हवाई दल प्रमुख, माजी लष्कर प्रमुख, माजी नौदल प्रमुख आणि दीर्घकाळ देशाची सेवा करणारे इतर वरिष्ठ सैनिक उपस्थित होते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.