जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam Terrorist Attack) एक मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. येथे दहशतवाद्यांच्या एका गटाने पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर ते खाद्य पदार्थ खात असताना अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्याच्या माध्यमातून काश्मीर खोऱ्यात दहशत पसरवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पर्यटकाचे नाव विचारून दहशतवाद्यांनी त्यांची क्रूरता दाखवली. जखमींनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पर्यटकांनी कॅमेऱ्यासमोर पुष्टी केली आहे की, दहशतवाद्यांनी प्रथम पर्यटकांना त्यांची नावे विचारली, ते हिंदू असल्याचे समजल्यावर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये (Pahalgam Terrorist Attack) किमान ६ पर्यटक जखमी झाले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दहशतवाद्यांनी एका रिसॉर्टवर गोळीबार केला होता ज्यामध्ये हे पर्यटक जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका महिला पर्यटकाच्या म्हणण्यानुसार, “माझ्या पतीच्या डोक्यात गोळी लागली होती तर या हल्ल्यात इतर ६ जण जखमी झाले होते.” एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिस पहलगाममधील (Pahalgam Terrorist Attack) बैसरन मैदानावर पोहोचले परंतु दहशतवादी आधीच पळून गेले होते. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे आणि शोध मोहीम सुरू आहे. सध्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीचे कोणतेही वृत्त नाही.
Join Our WhatsApp Community