जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर दोन दिवसांनी भारतात पाकिस्तान सरकारचे अधिकृत एक्स अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सला भारतातील पाकिस्तान सरकारचे अधिकृत अकाउंट ब्लॉक करण्याची विनंती केली होती. त्यानंतर एक्सने हे पाऊल उचलले आहे. (Pahalgam Terrorist Attack)
(हेही वाचा – “कल्पनेपलिकडची शिक्षा देणार, त्यांची उरलेली जमिनही …” ; PM Narendra Modi यांचा गंभीर इशारा)
भारत सरकारने केलेल्या विनंतीनुसार, पाकिस्तान सरकारचे अकाउंट निलंबित करण्यात असून, आता ते भारतातील युजर्ससाठी उपलब्ध नाही. दहशतवाद्यांना सतत पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी भारताने कठोर धोरण स्वीकारले आहे. सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची बैठक झाल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानवर (Pakistan) विविध निर्बंध लादले होते. त्यानंतर आता पाकिस्तान सरकारचे एक्स अकाउंटही (X account) भारतात ब्लॉक करण्याचाही निर्णय घेतला आहे.
पहलगामपासून सुमारे ५ किमी अंतरावर असलेल्या बैसरन परिसरात पाच ते सहा दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या एका गटावर गोळीबार केला. यामध्ये भारतातील २५ आणि नेपाळमधील एका पर्यटकाचा मृत्यू झाला. (Pahalgam Terrorist Attack)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community