जम्मू- काश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam Terrorist Attack) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे. पहलगाम येथे झालेल्या दुर्दैवी दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट थांबवला. पंतप्रधान बुधवारी सकाळी दिल्लीला परतले. २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर हा हल्ला खोऱ्यातील सर्वात मोठा आणि प्राणघातक दहशतवादी हल्ला असल्याचे मानले जात आहे. या हल्ल्याविरोधात संपूर्ण देशात शोक आणि संतापाचे वातावरण आहे. (Pahalgam Terrorist Attack)
कोणाला शंका येऊ नये म्हणून स्थानिक भाषेत संवाद
पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशीविदेशी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पन्नासहून अधिक गोळ्यांची फैर झाडली. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. पहलगाम हल्ला 8 ते 10 दहशतवाद्यांकडून झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच दहशतवाद्यांना 2 ते 3 स्थानिकांची मदत झाल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली. दहशतवाद्यांपैकी 5 ते 7 जण पाकिस्तानचे असल्याची माहिती समोर आली आहे. कोणाला शंका येऊ नये म्हणून स्थानिक भाषेत संवाद साधला जात होता. त्यामुळे केंद्र सरकार आता कोणतं पाऊल उचलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Pahalgam Terrorist Attack)
दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावं आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्याची माहिती आहे. टीआरएफ या दहशतवादी संघटनेने या भ्याड हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कर घटनास्थळी दाखल झाले असून, परिसराची नाकाबंदी करून, सर्च ऑपरेशन राबवण्यात येतं आहे. ड्रोन द्वारे परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. पर्यटकांवर झालेल्या गोळीबारानंतर काश्मीरमधील पर्यटक पुन्हा आपापल्या राज्यांमध्ये परतू लागले आहेत. (Pahalgam Terrorist Attack)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community