Pahalgam Terrorist Attack : “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” ; Amit Shah यांचा इशारा

Pahalgam Terrorist Attack : "दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही" ; Amit Shah यांचा इशारा

122
Pahalgam Terrorist Attack :
Pahalgam Terrorist Attack : "दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही" ; Amit Shah यांचा इशारा

मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर केलेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याने देशाला हादरवून टाकले आहे. २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर खोऱ्यातील सर्वात भीषण हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २६ जणांच्या मृत्युचा बदला घेण्याची शपथ घेतली आहे. दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही. पहलगाममध्ये भेकड हल्ला करणाऱ्यांवर अतिशय कठोर कारवाई करण्यात येईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी बुधवारी ठामपणे सांगितले.

या हल्ल्यानंतर सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून मायदेशात परतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिल्ली विमानतळावरच प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काश्मीर स्थितीबाबत चर्चा केली. त्यानंतर मृत व जखमी झालेल्यांच्या कुटुंबीयांशी तसेच हल्ल्यातून सुदैवाने वाचलेल्या लोकांशी अमित शाह यांनी संवाद साधला. त्यांना दिलासा देताना ते म्हणाले की, हा हल्ला करणाऱ्यांचा सुरक्षा दले शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करतील. त्यानंतर जिथे हल्ला झाला, त्या बैसरन घाटी या भागाला शाह यांनी भेट देऊन तिथे पाहणी केली. (Amit Shah)

गृहमंत्री शाह (Amit Shah) यांनी जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक नलीन प्रभात यांच्याकडून स्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी एका बैठकीत लष्करप्रमुख व नायब राज्यपाल यांच्याशी जम्मू- काश्मीरमधील स्थितीबाबत सविस्तर चर्चा केली. त्यांच्यासोबत नायब राज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला उपस्थित होते. (Amit Shah)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.