जम्मू-काश्मीरातील कुलगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक सुरू आहे. बुधवारी संध्याकाळी सुरक्षा दलांनी तंगमार्ग परिसरात दहशतवाद्यांना घेरले. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे. (Pahalgam Terrorist Attack)
हेही वाचा-Pahalgam Terrorist Attack चा पर्यटनाला फटका ; १५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट
त्यापूर्वी बुधवारी सकाळी (23 एप्रिल) बारामुल्लाच्या उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. सैन्याने २ दहशतवाद्यांना ठार केले. इथेही शोध सुरू आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा दलांना २-३ दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करताना दिसले होते. (Pahalgam Terrorist Attack)
हेही वाचा- Pahalgam Terrorist Attack : “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” ; Amit Shah यांचा इशारा
याच्या एक दिवस आधी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये २७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन पर्यटक आणि एका स्थानिक नागरिकाचा समावेश आहे. येथेही दहशतवाद्यांचा शोध मोठ्या प्रमाणात सुरू आहे. (Pahalgam Terrorist Attack)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community