मंगळवारी (२२ एप्रिल) जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ( Pahalgam Terrorist Attack ) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत लष्कर आणि गुप्तचर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत हल्ल्यानंतरची परिस्थिती आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर अमित शहा श्रीनगरला पोहोचले आहेत. पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील (Pahalgam Terrorist Attack) मृतांची संख्या वाढली आहे. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. या २६ लोकांमध्ये २५ पर्यटक आणि एक स्थानिक नागरिक आहे. मृतांमध्ये दोन महाराष्ट्रातील नागरिकांचा समावेश आहे, तसेच भारतीय वंशाचे दोन परदेशी नागरिकही आहेत.
पंतप्रधान मोदींनी अमित शहांशी फोनवर केली चर्चा
दहशतवाद्यांनी पर्यटकांवर ५० हून अधिक राउंड गोळीबार केला. मृतांचा आकडा वाढू शकतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दिल्लीहून श्रीनगरला पोहोचले आहेत यावरून परिस्थितीचा अंदाज येतो. ते दहशतवादी हल्ल्याच्या (Pahalgam Terrorist Attack) ठिकाणालाही भेट देतील. या दहशतवादी हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींनी अमित शहांशी फोनवरूनही चर्चा केली आहे.
नाव विचारल्यानंतर गोळ्या झाडल्या
मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात गुजरात, तामिळनाडू, ओडिशा आणि महाराष्ट्र राज्यातील पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. काही पर्यटकांची नावे विचारल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. महाराष्ट्रातील एका पर्यटकाला गंभीर दुखापत झाली. तर इतर तीन पर्यटक जखमी झाले. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Pahalgam Terrorist Attack)
सैनिक तैनात, यंत्रणा सतर्क
या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. ज्या भागात दहशतवादी हल्ला (Pahalgam Terrorist Attack) झाला त्या भागात सैनिक तैनात करण्यात आले आहेत. तपास संस्था देखील या दहशतवादी हल्ल्याची चौकशी करत आहेत. दरम्यान, हल्ल्यात जखमी झालेल्यांवर उपचार सुरू आहेत. यातील काही लोक गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Join Our WhatsApp Community