पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात (Pahalgam Terror Attack) सापडलेल्या टुलकिटची राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) कडून तपास सुरू आहे. पहलगाम दहशतवादी कटाची संपूर्ण माहिती असणारं टुलकिट आढळल्यानंतर सलग दहा दिवस एनआयएकडून तपास करण्यात येत आहे. टुलकिटमध्ये प्रवासाचा मार्ग आणि दहशतवाद्यांच्या ठावठिकाणाची माहिती असल्याचे चौकशीमार्फत समोर आले आहे. विशेष म्हणजे सुरक्षा एजन्सींपासून बचाव करण्याची रणनीतीदेखील यात असल्याचे उघड झाले आहे.
(हेही वाचा Pahalgam Terror Attack : लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी ! दहशतवादी हाफिज सईदच्या फोटोवर क्रॉस लावला आणि …)
एनआयए प्रमुख सदानंद दाते यांच्या नेतृत्वात तपास पथकाकडून प्रत्यक्षदर्शींना सोबत घेऊन बैसरन खोऱ्यात तपास सुरू आहे. दहशतवादी हल्ल्याची (Pahalgam Terror Attack) डेड ड्रॉप पॉलिसी उघडकीस आली असून यात दहशतवाद्यांकडून कोड लँग्वेजमधून २ दहशतवादी माहिती व शस्त्र शेअर करतात. त्याचबरोबर, निर्जन ठिकाणे शोधण्याच्या सूचना यात असतात. सरकारी जागेपासून दूर असणाऱ्या जागा निवडण्याच्या सूचनाही यात असतात.
दोन्ही हातात घड्याळ आणि आरामदायी शूज घालणे महत्त्वाचे, पोशाख पाश्चात्त्य व आधुनिक असावा जेणेकरून कुणालाही संशय येणार नाही. आपल्यासोबत जोडीदार वा मित्र न घेण्याच्या सूचना दिल्या जातात. लष्कर-ए-तोयबाशी संलग्नित तेहरीक-ए-पशबान या संघटनेकडून डेड ड्रॉप पॉलिसी महत्त्वाची असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Pahalgam Terror Attack)
Join Our WhatsApp Community