पहलगाम दहशतवादी हल्ल्या(Pahalgam Terror Attack)नंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देशांत युध्दाच्या भीतीने लष्काराच्या हालचालीं वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यातच आता भारताने संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानविरोधात मोर्चेबांधणीस सुरूवात केली. भारताने पाकिस्तानकडून दहशतवादाला मिळणाऱ्या अप्रत्यक्ष पाठिंब्याला रोखण्यासाठी जागतिक पातळीवर अनेक पावले उचलत आहे.
(हेही वाचा Pakistan च्या उत्पादनांना भारतात नो एन्ट्री; मोदी सरकारचा आणखी एक अटॅक)
दरम्यान, भारत जागतिक मनी लाँडरिंग आणि दहशतवाद वित्तपुरवठा देखरेख करणाऱ्या फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ)च्या ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तानचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करत आहे. भारताच्या प्रयत्नांना यश मिळाल्यास आंतरराष्ट्रीय नाणेनिधी(आयएमएफ)सारख्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांमधील पाकिस्तानच्या प्रवेशावर मर्यादा येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पाकिस्तानकडून दहशतवादाला मिळणारा पाठिंबा रोखण्याच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून (एफएटीएफ)च्या ‘ग्रे लिस्ट’मध्ये परत आणण्याचा विचार करत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर(Pahalgam Terror Attack) भारताने दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले. त्यानंतर “आम्ही कोणालाही सोडणार नाही,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यानंतर(Pahalgam Terror Attack) म्हटले होते. हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारताने दहशतवादाला सततच्या पाकिस्तानच्या पाठिंब्याला आळा घालण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोन स्वीकारला आहे. ज्यात सिंधू जल करार निलंबित करणे, देशातील सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करणे आणि त्यांच्या हवाई क्षेत्राच्या वापरावर बंदी घालणे याचा समावेश आहे.(Pahalgam Terror Attack)
Join Our WhatsApp Community